Mundhwa Pune Crime | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढले, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mundhwa Pune Crime | प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (Minor Girl Rape Case) करणाऱ्या आरोपीवर मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) पोक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा नोंदविला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2024 मध्ये आरोपीच्या घोरपडी (Ghorpadi) येथील राहत्या घरी घडला आहे.

गणेश चव्हाण (वय-21 रा. घोरपडी) याच्यावर आयपीसी 376, पोक्सो अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 17 वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि.12) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 17 वर्षीय तरुणीची गणेश सोबत ओळख झाली होती.
ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या.
गणेशने मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याने मुलीला घरी कोणी नसताना बोलावून घेतले.
तरुणी घरी आली असता तिच्यासोबत जवळीक साधली.
तसेच ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले.
मुलीने लग्नाबाबत विचारताच टाळाटाळ करुन लग्न करण्यास नकार दिला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Land Acquisition for DP Road Widening | शिवाजीनगरमध्ये ‘या’ रस्त्यावरील ५२ मिळकती ताब्यात घेणार, रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्याबाबत आदेश

Ganeshkhind Road Pune | गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन कायद्यानुसार जागा ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर

Waste To Energy Plant (Wte) Ramtekdi Pune | रामटेकडी येथील पुणे बायो एनर्जी प्रकल्पात 5 वर्षात कचऱ्यापासून एक युनिट देखील वीज निर्मिती नाही; प्रकल्पात कचऱ्याचे ढीग साठल्याने आरोग्याचा ‘धोका’ वाढला