‘मर्डर २’ फेम अभिनेत्री सुलगना पाणिग्रही अडकली लग्नबेडीत

पोलीसनामा ऑनलाइन – सुलगना पाणिग्रही “मर्डर २” आणि “रेड” चित्रपटात झळकली आहे. याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तर बिस्वा कल्याण रथ कॉमिकस्तानमध्ये स्टॅण्डअप कॉमेडी करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुलगना पाणिग्रही प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन बिस्वा कल्याण रथसोबत लग्नबेडीत अडकली आहे. मागील ९ डिसेंबरला त्या दोघांनी लग्न केले. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली आहे.

सुलगना पाणिग्रही आणि बिस्वा कल्याण रथने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत. आणि ही माहिती त्यांनी चाहत्यांना दिली आहे. बिस्वा कल्याण रथने इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी सुलगनासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सुलगना वधूच्या गेटअपमध्ये लेहंग्यात पेस्टल ब्लू ओढणीसोबत दिसली. बिस्वा कल्याण क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. तर रिसेप्शनमध्ये सुलगनाने लाल रंगाची साडी नेसली होती तर बिस्वा कल्याण निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतो आहे. या दोन्ही फोटोंमध्ये ते दोघे खूप छान दिसत आहेत. या फोटोसोबत बिस्वा कल्याणने मजेशीर कॅप्शन दिली आहे. सोशल मीडियावर सुलगना पाणिग्रही आणि बिस्वा कल्याण रथच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या दोघांचे चाहते या फोटोंना पसंती देत आहेत.

बिस्वा कल्याण रथने फोटो शेअर करत लिहिले की, “बिस्वाने माणसासोबत लग्न केले.” सुलगना पाणिग्रहीने देखील लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुलगना आणि बिस्वा कल्याण मंडपात लग्नाचे रितीरिवाज करताना दिसते आहे. तिनेदेखील फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिली आहे. सुलगनाने फोटो शेअर करत लिहिले की, “आमच्या सिंगल लाइफला जळताना पहा.” दुसऱ्या फोटोला तिने ही एक मजेशीर स्वारी आहे. “मी आता बिस्वा कल्याण रथसोबत लग्न केले. “