Murder in Chakan | पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून, पत्नीच्याही खूनाचा प्रयत्न

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पत्नीसोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याच्या संशयावरुन पतीने एकाचा खून केला. तर पत्नीच्याही खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चाकण (Murder in Chakan) येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीवर चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चाकण (Murder in Chakan) येथील नाणेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली.

अमोल गजानन राणे (वय-38 रा. आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश मदनलाल गालेच्या (वय-33 रा. बजरंग कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. बी 101, श्रीराम नगर, चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी रामेश्वर वामन पवार (वय-35 रा. नाणेकरवाडी ता. खेड) याच्यावर 302,307 कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल राणे आणि आरोपीच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी रामेश्वर याला होता. या कारणावरुन आरोपीने नाणेकरवाडी (Nanekarwadi) येथील भवानी प्रायव्हेट लिमिटेड (Bhavani Pvt. Ltd.) या कंपनीत येऊन
अमोल राणे यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अमोल यांचा
मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीला लोखंडी स्टूलने डोक्यात, तोंडावर, पाठीवर मारुन
गंभीर जखमी केले. आरोपीने अमोल राणे यांचा खून करुन पत्नीच्याही खूनाचा प्रयत्न केला. पुढील
तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (Assistant Inspector of Police Gaikwad,
Chakan Police Station) करीत आहेत.

हे देखील वाचा

Small and Retail Traders | छोट्या दुकानदारांसाठी मोठी बातमी! केंद्राने म्हटले, ई-कॉमर्स कंपन्यांकडून होणार नाही नुकसान, जाणून घ्या काय आहे प्लान?

Maharashtra Mantralaya | मंत्रालयातील तळीरामांना शोधण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Police | दुर्देवी ! जीममध्ये व्यायाम करताना सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Murder in Chakan | Murder of one on suspicion of immoral relationship with wife, attempted murder of wife also

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update