Murlidhar Mohol | पुणे विमानतळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे जंगी स्वागत (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Murlidhar Mohol | केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ आज सकाळी पुण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देखील पुणे विमानतळावर (Pune Airport) मोहोळ यांचे जंगी स्वागत केले.(Murlidhar Mohol)

ढोल, ताशा, हलगी आणि वारकऱ्यांच्या वेशातील मुलांनी मोहोळ यांचे स्वागत केले. यावेळी मोहोळ यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत त्यांना पगडी परिधान केली. पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ” दुसऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर येणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी आज इतकी गर्दी झाली, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. मला आज खूप आनंद होत आहे. शहरातील आणि राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी सांगितले.

नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री म्हणून केंद्रात शपथबद्ध झालेले मुरलीधर मोहोळ आज दिल्ली वरून पुण्यात
आले आहेत. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच ते पुण्यात परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी अनेक भाजपा नेते देखील उपस्थित होते.
प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनीही मोहोळांच्या स्वागताला हजेरी लावली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मराठा समाजासाठी काय केले ते आक्रमकपणे मांडा; भाजपच्या मराठा आमदारांना बैठकीत सूचना

Home Loan | SBI ने दिला जोरदार धक्का… महाग झाले कर्ज, आता भरावा लागेल जास्त ईएमआई

Pune Drug Case | पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास NCB कडे वर्ग, कुरकुंभच्या कारखान्याची ड्रग्स तस्करीची लिंक परदेशात

Bajaj Housing Finance | येत आहे बजाज ग्रुपचा आणखी एक मोठा IPO, कागदपत्रे SEBI कडे जमा… जाणून घ्या डिटेल्स

Police Constable End Life Due To Wife | पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोट जप्त