Music composer Avinash-Vishwajeet | ज्येष्ठ निर्माते प्रशांत घैसास यांच्या हस्ते संगीतकार अविनाश- विश्वजीत यांचा सत्कार

पुणे : Music composer Avinash-Vishwajeet |  ‘माय स्टेज’ या निर्मिती संस्थेतर्फे प्रसिद्ध संगीतकार अविनाश- विश्वजीत यांचा सत्कार ज्येष्ठ निर्माते प्रशांत पद्माकर घैसास यांच्या हस्ते करण्यात आला. संगीतक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला. लेखिका विनिता पिंपळखरे,अभिनेता गिरीश परदेशी ,ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे , सुरेंद्र गोखले,प्रवीण वानखेडे यांच्यासह नाट्य चित्रसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.पुष्पगुच्छ,भेटवस्तू देऊन हा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना संगीतकार अविनाश- विश्वजीत यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.’सांगतो ऐका’,
‘पोपट’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘बदाम राणी, गुलाम चोर’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’,’ती सध्या काय करते ‘,
‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे ‘,’ सरसेनापती हंबीरराव ‘ , ‘गैर’, ‘रेडी मिक्स ‘ सारख्या चित्रपटांसाठी तसेच
‘मर्डर मिस्ट्री -२ ‘ चे संगीत देतानाचे अनुभव यावेळी अविनाश- विश्वजीत यांनी सांगितले.
संगीतविषयक दोन दशकांचे त्यांचे योगदान , बॉलिवूड आणि हॉलिवूड मधील कार्यपध्दतीविषयीदेखील त्यांनी
अनुभव सांगितले.’तो शेवटचा दिवस ‘ या सस्पेन्स थ्रिलर दीर्घांकासाठी सध्या काम सुरु असल्याची माहिती
त्यांनी दिली. प्रशांत घैसास,विनिता पिंपळखरे,गिरीश परदेशी यांनीही मनोगत व्यक्त केले.

नुकताच २२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजता हॉटेल किमया सभागृह, कर्वे रस्ता (पुणे) येथे हा कार्यक्रम झाला.डॉ.दीपक बीडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title :-  Music composer Avinash-Vishwajeet | Composer Avinash- Vishwajeet felicitated by veteran producer Prashant Ghaisas

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे क्राईम ब्रँच न्यूज : दुकानातून सिगारेटचे बॉक्स चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Whatsapp New Feature | Whatsapp चं नवं फीचर, एक अकाऊंट चार फोनमध्ये वापरता येणार