‘मुळात माझं बच्चन हे आडनाव कोणत्याही धर्माशी संबंधित नाही’ : ‘बिग बी’ अमिताभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बी अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबियांची बच्चन आडनावामुळेही वेगळी ओळख आहे. बिग बींनी आपल्या बच्चन आडनावामागील खरी कहाणी सांगितली आहे. नुकताच कौन बनेगा करोडपती या शोचा गांधी जयंती निमित्तचा एपिसोड झाला. 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी झालेल्या या भागात बिग बींनी आपल्या आडनावाविषयी उलगडा केला आहे.

केबीसीच्या या भागात सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक खास अतिथी होते. यावेळी बिंदेश्वर पाठक यांनी म्हटलं की, समाजातील दलितांकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन आजही फारसा चांगला नाही. यावेळी बच्चन यांनी आपलं मत मांडलं. बिग बी म्हणाले, “माझे वडिल हरिवंशराय बच्चन हे होळीच्या सणाची सुरुवात मैला साफ करणाऱ्यांच्या पायाला रंग लावून करत असत.” आजही ही परंपरा अमिताभ बच्चन यांनी सुरू ठेवली आहे. आपण कोणत्याही धर्माशी संबंधित नसल्याचं सांगत त्यांनी आपण गर्वाने एक भारतीय असल्याची भावना व्यक्त केली.

बिग बी पुढे म्हणाले, “मुळात माझं बच्चन हे आडनाव कोणत्याही धर्माशी संबंधित नाही. माझे वडिल त्याविरोधात होते. माझं आडनाव हे श्रीवास्तव होतं. आम्ही त्यावर कधीच विश्वास ठेवला नाही किंवा गांभीर्याने घेतलं नाही. मी गर्वाने सांगतो की, बच्चन आडनाव लावणारा मी पहिलाच आहे.” असे म्हणत त्यांनी आपल्या वडिलांनी लिखाणादरम्यान वापरलेल्या टोपणनावाचा दैनंदिन जीवनातील नावात वापर केल्याचं स्पष्ट केलं.

बिग सांगतात, “जेव्हा जेव्हा अधिकारी जनगणनेसाठी अधिकारी माझ्या घरी येतात आणि ते माझ्या धर्माविषयी विचारतात तेव्हा मी कोणत्याही धर्माचा नसून एक भारतीय आहे असं सांगतो.”

Visit : Policenama.com