‘ती’ स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी होती : जितेंद्र आव्हाड

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील एटीएस पथकाने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून तब्ब्ल ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री पकडली. या खळबळजनक घटनेनंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. वैभव राऊतच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक विधान आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आव्हाड यांनी शुक्रवारी १० ऑगस्ट ला ट्विट करून हा आरोप केला आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता”, असं ट्विट आव्हाड यांनी केले  आहे.

इतकेच नाही तर नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते, तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचं खुलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी, अशी मागणीही आव्हाडांनी केली

दरम्यान, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके  जप्त केली. भांडार आळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. एटीएसने देशी बॉम्बसह, त्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली.
[amazon_link asins=’B01LXF1PDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee0b1127-9d4f-11e8-8501-6d4bacf6c9c8′]
एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान ,वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता, त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, गृहमंत्री वारंवार सनातन संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्य ती सर्व मदत करु, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी एबीपी माझाला दिली.