Birthday SPL : महेश बाबूमुळं नम्रता शिरोडकरनं सोडलं होतं फिल्मी करिअर ! ‘या’ कारणामुळं लपवून ठेवली होती डेटींगची बाब

पोलिसनामा ऑनलाईन – अ‍ॅक्ट्रेस नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) आज (शुक्रवार दि 22 जानेवारी) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. नम्रता साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) ची पत्नी आहे. महेश बाबू सोबत लग्न केल्यानंतर नम्रतानं सिनेमांपासून अंतर ठेवलं. एका मुलाखतीत नम्रतानं सांगितलं होतं की, ती सिनेमांपासून दूर का गेली होती.

…म्हणून नम्रतानं सोडली होती इंडस्ट्री

खरं तर महेश बाबूला वर्किंग वुमन नको होती. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना नम्रतानं लग्नानंतर सिनेमे सोडण्याबद्दल बोलताना सांगितलं होतं की, महेशला वर्किंग वुमन नको होती.

नम्रताला नाहीये इंडस्ट्री सोडल्याचा पस्तावा.

नम्रतानं 2018 मध्ये दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, मला करिअर सोडल्याचा अजिबात पस्तावा नाही. मीही करिअर ओरिएंटेड नव्हते जशा दुसऱ्या हिरोईन आहेत. मी माझ्या कामाला नक्कीच गांभीर्यानं घेतलं. परंतु मी काम कधीच मागितलं नाही किंवा कधी प्रसिद्धी किंवा पैसाही मागितला नाही. माझ्याकडे जे आलं ते मला मिळालं.

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर 2005 साली विवाहबंधनात अडकले. दोघांना आज दोन मुलंही आहेत. दोघांनी चार वर्ष एकमेकांना डेट केलं. पंरतु यावेळी त्यांनी आपलं नातं खूप सिक्रेट ठेवलं.

म्हणून नम्रतानं गुलदस्त्यात ठेवलं होतं महेशसोबतचं नातं

रिलेशनशिप सिक्रेट ठेवण्याबद्दल नम्रतानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, महेश रूल्स फॉलो करणाऱ्यांपैकी आहे. एवढंच काय तर मी त्याला चार वर्षे डेट करूनही त्याला आमचं नात ओपन करायचं नव्हतं. मीडिया प्रेशर बनवत होतं की, मी हे अ‍ॅडमिट करू. परंतु महेश क्लिअर होता. त्याला आधी करिअरमध्ये स्टेबल व्हायचं होतं. महेशसाठी कामाच्या आधी कुटुंब येतं. अनेक अ‍ॅक्टर्समध्ये ही क्वालिटी नसते. त्याला त्याचं स्टारडम पसंत होतं. परंतु त्यामुळं त्यानं स्वत:ला कधी प्रभावित नाही होऊ दिलं.

महेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, या तेलगू सुपरस्टारनं 1999 साली आलेल्या राजा कुमारूडू या सिनेमात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारत करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमासाठी त्याला सर्वश्रेष्ठ पुरुष कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. अद्याप त्याने 7 नंदी पुरस्कार, 5 फिल्मफेअर पुरस्कार, 3 सिनेमा पुरस्कार, 3 दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि एक आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार जिंकला होता.