Nana Patole | नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले ‘शिंदे सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) राज्य सरकार (State Government) बरखास्त करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी ते राज्यपालांना देखील भेटणार आहेत. तसेच आता त्यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. या सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.

यावेळी पटोलेंनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्राच्या वाट्याचे प्रकल्प ज्याप्रकारे गुजरातला जात आहेत, त्याप्रमाणे गुजरातचा मुंबईवर डोळा आहे. त्यामुळे आगामी काळात हे मुंबई देखील गुजरातला देतील. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) महाराष्ट्राला उद्धवस्त करणारे आहे. दिवाळीमध्ये वाटप करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) केला गेला आहे, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची
मागणी आणि राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे (Maharashtra Congress Committee) एक शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
(Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे अद्यापही शेतकऱ्यांना मदत
मिळत नसेल, तर सरकार काय करत आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कित्येक दिवस शेतकऱ्यांना मदत न
मिळाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, असे देखील पटोले म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्याचे थांबले होते.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांनी ईडी
आणि अन्य तपास यंत्रणांचा वापर करुन हे सरकार पाडले.
आणि त्यांच्या तालावर नाचणाऱ्या कळसुत्री बाहुल्यांचे सरकार आणले.
राज्यात सरकार बदलल्यापासून केवळ तीन महिन्यांत वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क (Bulk Drug Park),
टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प गुजरातला गेले, असे यावेळी नानांनी म्हंटले.

Web Title :- Nana Patole | nana patole claims that many mla of shinde and fadnavis government are in contact with him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा