Nandurbar Police – Bakari Eid | नंदुरबार पोलिस : बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय, SP पी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत निर्णय

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police – Bakari Eid | राज्यात काही भागात दोन गटात अनेक कारणांमुळे वादाच्या घटना होत असतानाच नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar News) मुस्लिम समुदायाने (Muslim Community) मात्र एक धाडसी निर्णय घेतला आहे. जगभरात येत्या 29 जूनला बकरी ईद (Bakari Eid) साजरी होत आहे. याच दिवशी महाराष्ट्राचे अध्यात्मिक दैवत विठुरायाची आषाढी एकादशीही (Ashadhi Ekadashi) आल्याने या दिवशी बकरी ईदची कुर्बानी (Nandurbar Police – Bakari Eid) न देता एकादशीनंतर सण साजरा करण्याचा निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लीम समुदायाच्या बहुतांश लोकांनी घेतला असून राज्यात सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

 

नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील (Nandurbar SP P.R. Patil) यांच्या अध्यक्षतेखाली मोहल्ला कमिटीची बैठक (Mohalla Committee Meeting) झाली. या बैठकीत बोलताना नागरिकांनी एकोप्याचे दर्शन घडवावे असे आवाहन पी. आर. पाटील यांनी केले होते. त्याला जिल्ह्यातील मुस्लिम समुदायाने सकारात्मकता दाखवून आषाढी एकादशी दिवशी हिंदू बांधवांच्या भावना जपण्यासाठी ऐक्याच्या दिशेने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आहे. एकादशीच्या दिवशीच बकरी ईद (Bakari Eid) असल्याने या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय ऐच्छिक असला तरी जवळपास सर्व मुस्लिम समुदायाने व मौलानांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून नंदुरबार पोलीसांचे (Nandurbar Police) या निमित्ताने कौतुक होत आहे. (Nandurbar Police – Bakari Eid)

 

सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या नंदुरबार पोलीस टीमचे प्रमुख पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe) यांचेसह नंदुरबार पोलीस उपअधीक्षक संजय महाजन (DySP Sanjay Mahajan), अक्कलकुव्याचे सदाशिव वाघमारे (Sadashiv Waghmare), शहाद्याचे दत्ता पवार (Datta Pawar), गृह पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी (DySP Vishwas Valvi) तसेच पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (PI Ravindra Kalamkar), किरण खेडकर, भारत जाधव, शिवाजी बुधवंत, राहुल पवार, निलेश गायकवाड, ज्ञानेश्वर वारे, दीपक बुधवंत, निशामुद्दीन पठाण, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, राजन मोरे, धनराज निळे, प्रकाश वानखेडे यांच्या टीमने याकामी चांगली भूमिका बजावली.

 

Web Title :  Nandurbar Police – Bakari Eid | Decision not to offer Qurbani on Bakri Eid, SP PR Decision in Mohalla Committee meeting chaired by Patil


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा