Nandurbar Police News |  नंदुरबार पोलिसांकडून ‘गुन्हेमुक्त गांव’ योजनेला सुरुवात

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police News |  नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Nandurbar SP P.R. Patil) यांच्या संकल्पनेतून ‘गुन्हेमुक्त गाव’ (Crime Free Village) उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 14 गावांमध्ये हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात नवापूर तालुक्यातील गडद या गावापासून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Nashik Division Special IG)  डॉ. बी.जी. शेखर पाटील (Dr. B. G. Shekhar Patil)  यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु करण्यात आली आहे. (Nandurbar Police News)

डॉ. बी. जी. शेखर पाटील म्हणाले, भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास आपोआप होत असतो. गदड गाव हे नावाप्रमाणेच वृक्षांनी गडद आहे. त्यात अधिक प्रयत्न करुन जास्तीत जास्त वृक्षारोपन करावे. गुन्हे मुक्त गाव मोहिमेंतर्गत गडद गावात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. (Nandurbar Police News)

गावातील किरकोळ स्वरुपाचे वाद सामोपचाराने गावातच मिटले तर त्याचा फायदा निश्चितच गावाला होत असतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी गडद गावात वाचनालय सुरु करण्यासाठी पाच हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले. गाव शांत असेल, वादविवाद नसतील तर त्याचा फायदा निश्चितच गावाला आणि पर्य़ायाने पोलीस दलाला होतो, असे सांगून गुन्हेमुक्त गाव राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन डॉ. बी.जे शेखर पाटील यांनी केले.

पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील म्हणाले, गाव पातळीवर अत्यंत किरकोळ कारणावरुन वाद निर्माण होत असतात. सुरुवातीला यात मोजके लोक गुंतलेले असले तरीही किरकोळ वादाचे निराकरण न झाल्याने लाहन वाद मोठे होतात व यात अधिकाधिक लोक गुंतून जातात. गुन्हा दाखल झाल्यानंतर गावातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण वर्गाचे व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. कौटुंबिक वादामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. जिल्हा पोलीस दलाने ‘गुन्हेमुक्त गाव’ अभियानांतर्गत गडद गावात विविध उपक्रम राबवण्याचे ठरवले असल्याचे पी. आर पाटील यांनी सांगितले.

गुन्हे मुक्त गाव मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात नवापूरमधील गडदसह जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधाळे, उपनगर पोलीस ठाण्यातील वडझाकण, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील पिंप्री, विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबोणी, शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरे व लोहारा, धडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी, सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवठळ, म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरा, अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील जांभली व नयनशेवडी, तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरकुवा, मोगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेलखेडी अशा 14 गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe), उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन (Sub Divisional Police Officer Sanjay Mahajan), नवापूर पोलीस ठाण्याचे (Navapur Police Station) पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे (PI Dnyaneshwar Ware), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर (LCB PI Kiran Kumar Khedkar), पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांकडून अटक