Narayan Rane | नारायण राणेंचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले – ‘शिवसेनेत परब हे ‘कलेक्टर’ असल्यामुळे…’ (व्हिडीओ)

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन –  Narayan Rane | मालवण (malvan) येथील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्प व राजापूर (Rajapur) येथील नाणार रिफायनरी प्रकल्प (nanar refinery project) हे प्रस्तावित जागेतच उभारण्यात येणार आहे. कोणी कितीही विरोध करू देत. ते बाजूला केले जातील. हे दोन्ही प्रकल्प स्थलांतरित केले जाणार नाहीत अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजप जिल्हा कार्यकर्ता (sindhudurg bjp) मेळाव्यासाठी शुक्रवारी उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) कुडाळ येथे आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, सूक्ष्म, लघू, मध्यम खात्याचे सर्व अधिकारी दिवाळीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणणार आहे. ज्या लाेकांना उद्योग-व्यवसाय करायचे असतील त्यांनी त्याबाबत त्यांच्याकडे नोंदणी करावी, तसेच कुडाळ तालुक्यात २०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र लवकरच तयार करण्यात येईल. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरही राणेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, एस.टी. कर्मचाऱ्यांची अवस्था तर अतिशय दयनीय आहे. शिवसेनेत परब हे कलेक्टर असल्यामुळे त्यांच्याकडून कर्मचारी काय अपेक्षा करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title : Narayan Rane | nanar refinery will be same place narayan rane talk on shivsena minister anil parab

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Police Welfare Fund | मुंबई पोलिसांचा खुलासा ! ‘पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून, राज्य सरकारकडून नव्हे’

SBI Alert | एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी कामाची बातमी ! बँकेकडून येत असलेल्या ‘या’ मेसेजकडे द्या लक्ष, जाणून घ्या काय करावे?

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर