Nashik CBI ACB Trap | 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना लष्करातील दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक येथील गांधीनगर मधील कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूलच्या Combat Army Aviation Training School (कॅट्स) आवारात दोन लष्करी अधिकाऱ्यांना (Military Officers) लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सीबीआयच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik CBI ACB Trap) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.13) सायंकाळी ट्रेनिंग स्कुलच्या आवारात करण्यात आली. मेजर हिमांशु मिश्रा (Major Himanshu Mishra) आणि कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले (Junior Engineer Milind Wadile) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे असल्याची माहिती सीबीआयच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Nashik CBI ACB Trap) पोलीस निरीक्षक रणजित पांडे (Police Inspector Ranjit Pandey) यांनी दिली.

एका ठेकेदाराकडून एक लाख वीस हजार रुपयांची लाचेची मागणी मिश्रा आणि वाडीले यांनी केली. तसेच लचेची रक्कम गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता कॅट्सच्या आवारात स्वीकारली असता पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. हे दोन्ही लष्करी अधिकारी येथील इंजिनिअरिंग सर्व्हीस विभागात (Engineering Services Department) कार्य़रत आहेत. मिश्रा हे सहायक गॅरिसन इंजीनियर (Assistant Garrison Engineer) तर वाडिले हे कनिष्ठ इंजीनियर पदावर असल्याचे सीबीआयच्या सुत्रांनी सांगितले.

मिश्रा आणि वाडिले या दोघांनी एका ठेकेदाराकडून काही तरी कामाच्या मोबदल्यात एक लाख वीस हजार रुपये लाच मागीतली होती.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दोघांना लाच घेताना ताब्यात घेतले.
नाशिकमध्ये सैनिक अस्थापनामध्ये अशा प्रकराचा भ्रष्टाचार पहिल्यांदाच उघडीस आला आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत ठेकेदाराने सीबीआयच्या लाचलुचपत विभागाकडे
(Nashik CBI ACB Trap) तक्रार केली आहे.
शहरातील लष्करी अस्थापनांमध्ये लाचखोरीविरोधात झालेली ही पहिली कारवाई आहे.

Web Title :- Nashik CBI ACB Trap | two army officers of cats caught in nashik while accepting bribe of rs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक- 2 नं कोल्हापूरच्या ‘डॉक्टर डॉन’ला इंदूरमधून घेतले ताब्यात; गज्या मारणेसह खंडणी प्रकरणात सहभाग निष्पन्न

Girish Mahajan | मला जाणून बुजून लक्ष्य केले गेले; व्हायरल ऑडिओ क्लीपवर गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

Rutuja Latke | राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके म्हणाल्या…