Nashik Crime News | वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करुन लुटणाऱ्या आरोपीला अटक, नाशिक पोलिसांकडून साडे 16 लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime News | एका 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेवर लोखंडी रॉडने वार करुन दागिने चोरुन नेणाऱ्या आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या तीन सराफ व्यवसायिकांना अटक करुन 16 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 286 ग्रॅम (28.6 तोळे) वजनाचे दागिने जप्त केले आहेत. (Nashik Crime News)

पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (वय-38 रा. कैलासजी सोसायटी, जेलरोड, नाशिक रोड), सोन्याचे दागिने विकत घेणारे सराफ व्यवसायिक प्रशांत विष्णुपंत नागरे (वय-43 रा. गुरुकृपा हौसिंग सोसायटी, कॅनल रोड, नाशिक रोड), हर्षल चंद्रकांत म्हसे (वय-42 रा. सिल्वर नेस्ट अपार्टमेंट, विजय नगर, नाशिक रोड), चेतन मधुकर चव्हाण (वय-30 रा. महात्मा फुले चौक, जव्हार, जि. पालघर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

https://www.instagram.com/reel/C2wpt-sJfEu/?utm_source=ig_web_copy_link

सामगाव येथील शकुंतला दादा जगताप (वय-75) या 1 जानेवारी रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास दुकानात असताना एका अनोळखी व्यक्ती पांढऱ्या मोपडेवरुन आला. त्याने दुकानात येऊन महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करुन चार तोळे वजनाचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस ठाण्यातील तपास पथक आणि गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाकडून केला जात होता. युनिट एकच्या पथकाने आरोपी विशाल गांगुर्डे याला अटक करुन नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात दिले.

नाशिक रोड पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीची पोलीस कोठडीमध्ये चौकशी केली असता त्याच्याकडून वृद्ध महिलेला मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार, दुचाकी जप्त केली. विशाल गांगुर्डे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सात गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात चोरलेले दागिने सोनाला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी तीन सोनारांना अटक करुन 16 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 286 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले. आरोपीकडून नाशिक रोड पोलीस ठाण्यातील सहा आणि उपनगर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक (IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 मोनिका राऊत,
सहायक पोलीस आयुक्त, नाशिक रोड विभाग डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे पवन चौधरी, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक
गणेश शेळके, पोलीस अंमलदार विजय टेंमगर, विष्णु गोसावी, बच्चे, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे,
अरुण गाडेकर, मनोहर कोळी, नानना पानसरे, यशराज पोतन, संतोष पिंगळे, भाऊसाहेब नागरे, रानडे, कल्पेश जाधव
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

डेटिंग ॲपवरील ओळख पडली महागात, पुण्यातील तरुणीला 27 लाखांचा गंडा

पुणे : जागा विक्रीच्या बहाण्याने महिलेची 1 कोटीची फसवणूक, वकिलासह चार जणांवर FIR; दोघांना अटक

दोन कंपन्यांनी एकाच वितरकाला घातला गंडा ! हाय स्पीड मोटार लावून लो स्पीड ई दुचाकी असल्याचे सांगून केली फसवणूक