Nashik : खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकच्या (Nashik) हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने नाशिकमधील (Nashik) कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सरकारी रुग्णालयांमध्ये कोरेाना बेड उपलब्ध असल्याने खासगी कोविड सेवा आपण बंद करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, यामागे दुसरं कारण असल्याची चर्चा सर्वत्र आहे. खासगी डॉक्टर्स गेल्या दीड वर्षापासून कोरोना रुग्णसेवा करीत असून डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांवर ताणही आला आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याने कोरोना रुग्णांवर तूर्तास उपचार करणार नाही असं खासगी रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आजवर कोरोनावर उपचार करण्यात आले असून, यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.

राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘राजकारणात काहीही घडू शकतं’

कोरोनाच्या काळात सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बऱ्यापैकी बेड उपलब्ध होत आहेत. कोरेाना Corona संसर्ग आता बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे रुग्णांना या रुग्णालयांमध्ये उपचार मिळणे शक्य होणार असल्याने यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेणार नसल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे. निवेदनावर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सचिन देवरे, डॉ. राज नगरकर, डॉ. समीर अहिरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

दरम्यान, नाशिकमधील (Nashik) अवाजवी बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या विरोधात महापौर सतीश कुलकर्णी आक्रमक झाले होते. त्यात आता रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना दाखल करुन न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी  कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नाशिकचे महापौर कुलकर्णी यांनी खासगी रुग्णालयांच्या बिलामध्ये तफावत आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बिलामध्ये तफावत आढळल्यास थेट रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात येईल, असं देखील कुलकर्णी यांनी सांगितले आहे. नाशिकच्या वोकहार्ट रुग्णालयात बिलाचा मुद्दा समोर आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी चांगलेच आक्रमक झाले होते. वाढीव बिलाबाबत तक्रार असल्यास आता हॉस्पिटल विरोधातील तक्रार थेट महापौरांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

 

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या