Nashik – Pune railway line | पुणे रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना 5 पट मोबदला, पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक-पुणे रेल्वे मार्गामध्ये (Nashik – Pune railway line) येणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या (Land) मोबदल्यामध्ये पाच पट मोबदला (compensation) मिळवून दिला जाईल. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, सरकार बाधित शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य (Cooperation) करेल असे आश्वासन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Nashik Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी दिले. नाशिक-पुणे रेल्वे मार्गातील (Nashik – Pune railway line) बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भुजबळ यांची भेट घेतली.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन रुग्ण, तर 15,176 जणांना डिस्चार्ज

शेतकऱ्यांकडून भूजबळ यांना निवेदन (Statement from farmers to Bhujbal)
नाशिक तालुक्यातील नानेगाव आणि परिसरातील (Nanegaon and surrounding area) बाधित शेतकऱ्यांच्या (Affected farmers) शिष्टमंडळाने सोमवारी (दि.14) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन (Statement) भुजबळ यांना दिले. मौजे नाणेगाव येथे नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या (Nashik – Pune railway line) भूसंपादन व अधिग्रहीत (Land Acquisition and Acquisition) शेतजमिनीच्या मोजणीचे काम सुरु आहे.

प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी बारमाही बागायती आहेत. तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे शेतीच आहे. त्यामुळे जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन स्विकारल्यानंतर भुजबळ यांनी शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याचे आश्वासन दिले.

Reservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांच्या क्षेत्राची 2 ते 3 तुकड्यांत विभागणी होणार आहे, त्यामुळे संपूर्ण क्षेत्राची संमतीनुसार खरेदी करावी.
द्राक्षबागा निर्यातक्षम दर्जाच्या आहेत.
त्यामुळे निर्यातदारांचे मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.
क्षेत्राची विभागणी झाली तर उर्वरीत संपूर्ण द्राक्षबागेची व इतर साधन सामुग्रीची व बांधावरील फळझाडांचा योग्य मोबदला मिळावा.
बाधित होणाऱ्या पाईपलाईन 25 मीटरवर क्रॉसिंग होण्याकरीता व्यवस्था असावी.
पाईपलाईन, विहीर, बोअरवेल यांचा मोबदला मिळावा.
बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला द्यावा.
बाधित शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी (Government job) द्यावी.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Nashik Pune railway line guardian minister promises to pay five times compensation to farmers on pune railway line

हे देखील वाचा

double murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून, महिलेचा मृतदेह सासवड रोडवर तर मुलाचा कात्रज परिसरात आढळल्याने प्रचंड खळबळ

किडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’ खबरदारी घ्यावी, जाणून घ्या