मोदी सरकारची मोठी घोषणा ! 12 कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात ‘ट्रान्सफर’ होणार पैसे, जाणून घ्या कुणाला मिळणार ‘लाभ’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मिड डे मील योजनेंतर्गत पहिली ते आठवीं इयत्ता पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर (Money transfer) केले जातील. मध्यान्न भोजन योजना (मिड डे मील) अतंर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणद्वारे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना विशेष मदत उपायांतर्गत ही मदत उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. सरकारच्या या उपायाने देशात सरकारी आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांमध्ये पहिली ते आठवी इयत्ता पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ होईल.

शिक्षण मंत्रालयानुसार, केंद्र सरकार यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक हजार दोनशे कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देणार आहे. या निर्णयाने कोविड महामारी दरम्यान मुलांना आवश्यक पोषण उपलब्ध करणे आणि त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळेल. ही माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली आहे.

या निर्णयामुळे दशभरातील 11.20 लाख सरकारी आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांमधील पहिली ते आठवीच्या सुमारे 11.8 कोटी विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

…म्हणून 2 मुलींची आई अन् शिक्षिका असेलेल्या महिलेकडून तरूणाला ब्लॅकमेल, अखेर युवकानं केली आत्महत्या

काय आहे – मध्यान्न भोजन योजना
मध्यान्न भोजन योजना (मिड डे मील) 15 ऑगस्ट 1995 ला सुरू करण्यात आली होती. ती ‘नॅशनल प्रोग्राम ऑफ न्यूट्रिशनल सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन’ अंतर्गत सुरू करण्यात आली होती. 2017 मध्ये एनपी-एनएसपीईचे नाव बदलून ‘नॅशनल प्रोग्राम ऑफ मिड डे मील इन स्कूल’ करण्यात आले. आज ही योजना मध्यान्न भोजन योजना म्हणून प्रसिद्ध आहे.

अलिकडेच देशाच्या उपराष्ट्रपतींनी मध्यान्न भोजन योजनेत दुधाचा समावोश करण्याचे निर्देश दिले आहेत. या भोजन योजनेचा लाभ सरकारी शाळा, सरकारकडून निधी प्राप्त शाळा, स्थानिक युनिट सारख्या महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळा, स्पेशल ट्रेनिंग सेंटर, मदरसा आणि मकतबांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दिला जातो. ही योजना सर्व शिक्षण अभियान अंतर्गत चालवली जाते.

Also Read This : 

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 31,671 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.24 %

 

मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन

 

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जेवणानंतरही तुम्ही ‘हे’ आसन करू शकता, ‘हे’ आहेत फायदे

 

बाबा रामदेव यांच्या भूमिकेला भाजप आमदाराचा पाठिंबा, म्हणाले – ‘ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टर्स राक्षसांसारखे काम करताहेत’