Coronavirus : बदलत्या स्वरूपासह जास्त धोकादायक होतोय कोरोना, ‘या’ व्हेरिएंटने होतोय विध्वंस, तिसरी लाट असेल जास्त ‘घातक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लागोपाठ होत असलेल्या म्युटेशनमुळे कोरोना व्हायरस जास्त धोकादायक होत चालला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून मोठ्या प्रमाणात सुरक्षित बाहेर पडणार्‍या भारतात कोरोनाच्या दोन नवीन व्हेरिएंटने विध्वंस माजवला आहे. यामध्ये सुद्धा भारतात पहिल्यांदा आढळलेल्या डबल म्यूटेंट व्हेरिएंटला सध्या संसर्गासाठी जास्त जबाबदार मानले जात आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) नुसार 4 मेपर्यंत देशाच्या 27 राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ब्रिटिश आणि डबल म्यूटेंट व्हेरिएंट पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत सरकारचे मुख्य शास्त्रज्ञ सल्लागार डॉक्टर के. विजय राघवन यांनी ऑक्टोबरनंतर संपूर्ण जगात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी याच व्हेरिएंटला जबाबदार ठरवले आहे. ऑक्टोबरनंतर संपूर्ण जगात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी याच व्हेरिएंटला जबाबदार धरले जात आहे. मागच्या वर्षी जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जगात दर महिन्याला कोरोना व्हायरसचे दोन व्हेरिएंट रिपोर्ट केले गेले. हे व्हेरिएंट सुद्धा मोठ्या प्रमाणात जुन्या व्हायरससारखेच होते. परंतु सप्टेंबरच्या अखेरीस तीन व्हेरिएंट असे सापडले, जे संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरले. हे व्हेरिएंट ब्राझील, दक्षिण अफ्रीका आणि ब्रिटनमध्ये आढळले होते, जे या देशांसह युरोप आणि अमेरिकेच्या अनेक देशात दुसर्‍या लाटेचे कारण बनले.

भारतात सुद्धा पंजाब आणि गुजरातमध्ये संसर्गासाठी प्रामुख्याने ब्रिटिश व्हेरिएंटला जबाबदार मानले जात आहे, तर महाराष्ट्रात डबल म्यूटंट व्हेरिएंटला. दिल्लीत ब्रिटीश आणि डबल म्युटंट दोन्ही व्हेरिएंट आढळून आले आहेत. एनसीडीसीचे संचालक सुजीत कुमार म्हणतात की, डबल म्युटंट व्हेरिएंट जरी सर्व राज्यांमध्ये आढळला असला तरी दुसर्‍या लाटेसाठी यास जबाबदार ठरवणारा डाटा आमच्याकडे सध्या नाही.

भारतात दुसर्‍या लाटेसाठी डबल मुटेंट व्हेरिएंट जबाबदार असल्याचे सरकार अधिकृतरित्या सांगत नसले तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यास प्रमुख कारण मानतात. स्वामीनाथन यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की, जागतिक आरोग्य संघटना लवकरच डबल म्युटेंट व्हेरिएंटला ’व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ घोषित करू शकते. म्हणजे या व्हेरिएंटबात संपूर्ण जगाला चिंतीत होण्याची आवश्यक आहे.

तिसरी लाट असेल जास्त घातक

समस्या केवळ दुसर्‍या लाटेसाठी जबाबदार व्हेरिएंटची नाही. दुसरी लाट हळुहळु पीकवर पोहचू सुद्धा लागली आहे. चिंता या गोष्टीची आहे की दररोज नवीन व्हेरिएंट समोर आल्याने कोरोनाची तिसरी लाट कदाचित दुसरीपेक्षा सुद्धा जास्त घातक होऊ नये. डॉक्टर के. विजयराघवन यांनी स्पष्टपणे या धोक्याकडे इशारा केला आहे. चिंता या गोष्टीची सुद्धा आहे की, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या समोर सध्याच्या व्हॅक्सीनची सुरक्षा अपुरी ठरू नये, जसे की, एक-दुसर्‍या प्रकरणांमध्ये आताही दिसून येत आहे. आयसीएमआरच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, व्हेरिएंट ओळखणे अवघड नाही. आतापर्यंत 13 लाखापेक्षा जास्त व्हेरिएंट आढळले आहे.