देशात तयार होणार रॉकेट लाँचरचा ‘फ्यूल टँक’, संपणार परदेशावरील ‘अवलंबत्व’

भिलाई : राकेट लाँचरच्या फ्यूल टँक (इंधनाची टंकी) साठी अन्य देशांवरील अवलंबत्व आता संपणार आहे. देशाला आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नात भिलाई इस्पात प्लँट (बीएसपी) ने पाऊल उचलले आहे. या अंतर्गत रॉकेट लाँचरचा फ्यूल टँक बनवण्यासाठी प्लँटमध्ये विशेष स्टील प्लेट तयार केल्या जातील. या स्वदेशी प्लेटचा उपयोग इस्त्रोच्या मानवयुक्त उपग्रह मिशन कार्यक्रम ’गगनयान 2022’च्या प्रक्षेपणात केला जाईल.

इस्त्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) च्या अंतराळ अभियानासाठी येथे तयार गुणवत्तायुक्त स्टील या आठवड्यात संमिश्र धातू निगम लिमिटेडला पाठवण्यात येतील. मुख्य महाव्यवस्थापक जे. के. सेठी आणि निरीक्षण मुख्य महाव्यवस्थापक (गुणवत्ता) एस. के. कर यांच्या निर्देश आणि नेतृत्वात तयार या प्लेटचे संमिश्र धातू कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत कठोर निरीक्षण आणि परीक्षण केले जाईल.

याच स्टील प्लेटद्वारे टँकसाठी 11 थरांच्या एमडीएन-250 प्लेटची निर्मिती केली जाईल. 9.3 मिलीमीटर जाड स्टीलच्या प्लेटमुळे टँकवर वातावरणाच्या घर्षणाचा प्रभाव पडणार नाही. पूर्वेत ऑस्ट्रिया आणि रशिया इत्यादी देशांकडून या विशेष प्लेट मागवल्या जात होत्या. सॅटेलाइट वाहनाच्या दोन्ही बाजूला फ्यूल टँक असते.

देशाला आत्मनिर्भर बनवणार
बीएसपी (प्लेट मिल) चे महाप्रबंधक एमके गोयल यांनी म्हटले की, एमडीएन-250 प्लेट अनेक मापदंडांसह तयार केल्या जातात. यासाठी तंत्रकौशल्यासह इतरही दक्षतेची गरज असते. बीएसपीने प्लेटमध्ये निपुणता मिळवली आहे. हा प्रयत्न देशाला आत्मनिर्भर बनवण्यात मैलाचा दगड ठरेल.