Navneet Rana | हनुमान चालिसा प्रकरण : दोषमुक्तीसाठी राणा दाम्पत्याची विशेष कोर्टात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणातून दोषमुक्तता करा.(Navneet Rana) अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी विशेष न्यायालयात आज दि.१० अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर विशेष न्यायालयाने मुंबई पोलिसांना २ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. ( Navneet Rana)

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा भाजपचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी दिला होता. असे करून राणा दाम्पत्यांनी कायदा व व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी सध्या राणा दाम्पत्य जामीनावर बाहेर आहे. ( Navneet Rana)

याप्रकरणी, आज विशेष न्यायालयात सुनावणी झाली असता, दोघांकडूनही या प्रकरणात दोषमुक्त करण्याच्या मागणीचा अर्ज करण्यात आला. त्यानंतर विशेष न्यायालयने मुंबई पोलिसांना राणा दाम्पत्याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले गेले.

दरम्यान. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणा दाम्पत्य उपस्थित राहत नसल्याने त्यांच्याविरोधात
विशेष न्यायालयाने तिसऱ्यांदा जामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य सुनावणीसाठी हजर राहिले.
नंतर विशेष न्यायालयाने जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले.
राणा दाम्पत्याच्या अर्जावर मुंबई पोलिस काय निर्णय घेतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- Navneet Rana | navneet and ravi rana applied for exoneration in special court about hanuman chalisa case mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘सरकारमधले जे अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी…’

Arvind Sawant | अरविंद सावंत यांचे मशाल यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले…