गोव्यात क्रॅश झालेल्या MiG-29K पायलटचा मृतदेह 11 दिवसांनी सापडला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलाच्या ट्रेनी एअरक्राफ्ट MiG-29K या वैमानिकाचा मृतदेह सोमवारी (दि. ७) अरबी समुद्रात सापडला. भारतीय नौदल गेल्या 11 दिवसांपासून समुद्रात सर्च ऑपरेशन करत होते. 26 नोव्हेंबरला हे एअरक्राफ्ट क्रॅश झाले होते. यात एका पायलटला बाहेर काढले होते, तर दुसरा बेपत्ता होता. त्याचा मृतदेह आज शोधण्यात यश आले आहे.

कमांडर निशांत सिंह असे या मृत पायलटचे नाव आहे. भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, निशांत सिंह यांचा मृतदेह गोवा कोस्टपासून जवळजवळ 50 किलोमीटर दूर अरबी समुद्रात मिळाला आहे. मृतदेह 70 मीटर खोल पाण्यात आढळून आला आहे.
प्रॅक्टिसदरम्यान क्रॅश झाले होते एअरक्राफ्ट

भारतीय नौदलाचे एअरक्राफ्ट 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता क्रॅश झाले होते. एअरक्राफ्ट अरबी समुद्रात पडले होते. याची माहिती दुस-या दिवशी नौदल अधिका-यांना मिळाली होती. सर्च ऑपरेशन दरम्यान नौदलाचा शोध घेणे सुरू करण्यात आला. एका पायलटला सुरक्षितपणे शोधण्यात आले होते. दुस-या पायलटचा शोध सुरू होता.