Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला “यापुढे चित्रपटाच्या स्क्रिप्ट निवडताना घेणार काळजी …”

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलीवुडमधील एक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. नवाजुद्दीनचा चाहता वर्ग मोठा असून त्याच्या प्रभावी अभिनयावर चाहते फिदा आहेत. त्याने अनेक चित्रपटांमध्ये व वेबसिरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा लवकरच नवे चित्रपट (Nawazuddin Siddiqui Upcoming Movie) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नवाजुद्दीनचा ‘सेक्शन 108’ हा नवाकोरा चित्रपट (Section 108 Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचा टीझर (Section 108 Movie Teaser Out ) नुकताच रिलीज झाला. ‘सेक्शन 108’ टीझर लॉन्चच्या कार्यक्रमाचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दरम्यान नवाजुद्दीनने केलेले वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यावेळी म्हणाला आहे की “मी यापुढे चित्रपटाच्या स्क्रिप्ट निवडताना काळजी घेणार आहे.”

मनोरंजन विश्वामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी य़ाने त्याच्या कलेच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तो त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या ‘हड्डी’ या बहुचर्चित चित्रपटाचा (Haddi Movie) देखील ट्रेलर लॉन्च झाला. यामध्ये त्याने ट्रान्सजेंडरची भूमिका (Nawazuddin In Transgender Role) साकारली असून चित्रपटातील त्याचा लूक जबरदस्त व्हायरल झाला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आणखी एक नवा ‘सेक्शन 108’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील लूक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या चित्रपटाच्या टीझर लॉन्च कार्यक्रमावेळी नवाजुद्दीनने त्य़ाच्या ‘सेक्शन 108’ चित्रपटाबद्दल व त्य़ाच्य़ा भूमिकेबद्दल मत व्यक्त केले.

कार्यक्रमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, “2024 मध्ये काय होईल? हे मला माहीत नाही. पण हो, मी माझ्या स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन. माझे काही प्रयोग मी ठरल्याप्रमाणे झाले नाहीत. म्हणून आता हुशारीने स्क्रिप्ट्स निवडेन. मी आता फक्त चांगले चित्रपट करण्याचा प्रयत्न करेन. ‘सेक्शन 108’ ही एक अप्रतिम कथा आहे. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा खूप मनोरंजक आहे.” असे मत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मांडले. त्याचे ‘मी माझ्या स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन’ हे वक्तव्य सध्या खूप गाजते आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. नवाजुद्दीनच्या बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan), गँग ऑफ वासेपूर (Gangs Of Wasseypur), मंटो (Manto), ठाकरे (Thackeray Movie) या चित्रपटातील भूमिका खूप गाजल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट (Tiku Weds Sheru) ओटीटीवर रिलीज झाला होता. यामध्ये त्याने वयाने लहान असणाऱ्या अवनीत कौर हिच्यासोबत किसिंग सीन (Avneet Kaur Kissing Scene) दिल्याने त्याला ट्रोल (Nawazuddin Siddiqui Trolling) करण्यात आले होते.

त्याचा आगामी ‘सेक्शन 108’ हा चित्रपट 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित (Section 108 Movie Release Date)
होणार आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच रेजिना कॅसॅंड्रा (Regina Cassandra),
आसिफ खान (Aasif Khan), रुमी खान (Rumi Khan), सानंद वर्मा (Saanand Verma),
अलीशा ओहरी (Alisshaa Ohri) आणि सहर्ष कुमार शुक्ला (saharsh kumar shukla)
हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

ACB Trap News | 1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह (BDO) तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात