Gadchiroli : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळले

गडचिरोली :वृत्तसंस्था
कसणासुर बोरियाची घटना ताजी असतानाच आता मुलासरा तालुक्यापासून जवळच असलेल्या गट्टा येथे नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळल्याचे तसेच ट्रकच्या चालकाला मारहाण केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.

गावातील जंगलात एफडीसीएमचे काम सुरु आहे. काम झाल्यावर रात्री चारचाकी वाहने गावात आणली जातात, याच वाहनांना नक्षलवाद्यांनी टार्गेट केले आहे. काल मध्यरात्री शस्त्रधारी नक्षलवादी मोठ्या संख्येने गावावजवळ आले आणि गावात झोपलेल्या वाहन चालकांना उठवून वाहने गावाबाहेर न्यायला सांगितली. वाहन चालकांना मारहाण केली आणि वाहने पेटवून दिली.
दरम्यान , गट्टा रस्त्यावर मोठमोठे बॅनर लावून कसनासुर बोरिया घटनेचा निषेध करत 10 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.