श्रीलंकेच्या बोटमधून 300 KG हेरॉईन ड्रग्ससह AK47 बंदुकीचा साठा जप्त, PAK कनेक्शन?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चेन्नई प्रादेशिक अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. तर श्रीलंकेच्या एका बोटीतून तब्बल ३०० किलो हेरॉईन ड्रग्स आणि AK 47 बंदुकीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही एक मोठी कारवाई NCB ने केली आहे. तसेच ६ श्रीलंकन नागरिकांनाही चेन्नई NCB ने अटक केली आहे. तर या कारवाईचं कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचं पुढं आले आहे. तर या कारवाईमुळे ड्रग माफिया आणि अतिरेकी घटकांचं कनेक्शन उघड झालं असून तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

अधिक माहितीनुसार, चेन्नईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) तपास यंत्रणांना माहिती मिळाली की श्रीलंकेमधून एका बोटीमध्ये ड्रग्स आणि हत्यारे भारतात येणार आहेत. दरम्यान, ही बोट चाबाहार बंदर इराणवरून आलं होतं. ते पार्सल श्रीलंकेच्या बोटवर लक्ष्यदीप येथील समुद्री भागात ठेवण्यात आलं. जे श्रीलंकेत नेण्यात येणार होतं, त्याप्रमाणे NCB ने भारतीय तटरक्षक दलात योग्यतेने सापळा रचला आणि श्रीलंकेमधून येणाऱ्या बोटीचा तपास घेतला आणि त्याला ताब्यात घेतलं. त्या बोटीत पाण्याच्या टाकीमध्ये ३०१ पाकीटं मिळाली ज्यामध्ये सफेद रंगाची पावडर होती, जी कोकेन होती. पॅकेटवर घोड्याचे चित्र होतं. ड्रग्सच्या ब्रॅण्डिंगसाठी हे असे चित्र वापरण्यात येत असल्याचं चेन्नई NCB चे डायरेक्टर अमित घवाते यांनी सांगितलं आहे.

तसेच या बोटीत, ५, AK 47 आणि १००० गोळ्या सुद्धा चेन्नई NCB ने या बोटवरून जप्त केल्या आहेत, तर त्या बोटीमधून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे एल वाय नंदाना, एचकेजीबी दासपप्रिया, AHS गुणसेकरा, एसएएस सेनारथ, टी रानासिंगा, डी निससंका असून हे सर्व श्रीलंकेचे लोक आहेत. तर यांना २७ मार्चला अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर यापूर्वी अरब महासागरात अशाप्रकारे ज्या कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानचं कनेक्शन स्पष्ट झालं होतं. दरम्यान, ही कारवाई चेन्नई NCB चे डायरेक्टर अमित घवाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिटेंडेंट एम सुरेश कुमार, आशिष कुमार ओझा, इंटेलिजन्स ऑफिसर सैजु वरगिसे, मॅथ्यू वरगिसे, सॅमसन, डी प्रमिला, शानमुगम या पथकाने केली आहे.