NCP MLA Dattatray Bharne | पवारांचा पठ्ठ्या आहे, कोठून विकास निधी आणायचा ते मला माहिती – दत्तात्रय भरणे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जरी विरोधी गटाचा आमदार असलो तरी मी एवढा सोपा नाही. पवारांचा पठ्ठ्या आहे. कोठून विकास निधी (Development Fund) आणायचा ते मला माहिती आहे, आगामी काळात तालुक्यात विकासाचा ओघ कायम राहील, असे माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे (NCP MLA Dattatray Bharne) यांनी सांगितले. इंदापूर शहरातील बाब्रस मळा भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण दत्तात्रय भरणे (NCP MLA Dattatray Bharne) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Gartkar), सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने (Dasaratha Mane) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दत्तात्रय भरणे  म्हणाले, जाहिरातबाजी करुन निव्वळ गप्पा मारुन लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. गप्पा मारणाऱ्यांना गप्पा मारु द्या. आपण काम करु. बाकीच्या लोकांसारखा हा आमदार झोपलेला नाही. कोठून विकास निधी आणायचा हे मला माहिती आहे. लवकरच नवीन विकासकामांची यादी ऐकायला मिळेल असे भरणे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर बाब्रस यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज भापकर, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे, बापू भिसे, संतोष काळे, प्रवीण शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title :- NCP MLA Dattatray Bharne | indapur mla dattatray bharane sharad pawar ajit pawar fund for development work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indurikar Maharaj | समाजप्रबोधनकार इंदूरीकर महाराजांच्या सासूबाईंचा भाजपात प्रवेश; प्रवेश करताच म्हणाल्या…

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Akshay Kelkar | अक्षय केळकरने विजेते पद पटकावल्यानंतर त्याला मिळाली तब्बल एवढी रक्कम; वाचून व्हाल थक्क

Legislative Council Election | विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या 3 उमेदवारांची घोषणा, ‘या’ जागेचा निर्णय गुलदस्त्यात (व्हिडिओ)