NCP MLA Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाले – ‘आरोपामागे भाजपचा हात, अजितदादांची ताकद…’

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MLA Rohit Pawar On Ajit Pawar | माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी लिहिलेल्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) पुस्तकात अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांची पाठराखण करताना भाजपवर आरोप केले आहेत. या आरोपांमागे भाजपचा हात असावा, भाजप नेहमी ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण करते असा आरोप रोहित पवारांनी केला. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (NCP MLA Rohit Pawar On Ajit Pawar)

रोहित पवार पुढे म्हणाले, ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण भाजपने सतत केले आहे. अजितदादांची लोकांमध्ये जी इमेज आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे. अचानक हा मुद्दा पुढे येणं, त्यावर लोकांमध्ये चर्चा होणं आणि अजित पवारांना उत्तर द्यावं लागण हा त्याचाच भाग आहे का? हे पाहिले पाहिजे. भाजपकडून अजितदादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (NCP MLA Rohit Pawar On Ajit Pawar)

रोहित पवार म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नेहमी बारामती लोकसभा जिंकण्याबाबत वक्तव्य करावं लागत आहे. बारामतीमध्ये त्यांना यश मिळणार नाही, त्यामुळे बावनकुळे हे घाबरले आहेत. त्यावर वारंवार वक्तव्य करत आहेत, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून काही भाष्य केलं होतं.
त्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना त्यांनी आपल्याला येरवडा जेलच्या परिसरातील जागा ही
खासगी बिल्डरला द्यावी असं सांगितल्याचा आरोप केला आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची तोफ मुंबईत धडाडणार, मराठा आरक्षणासाठी घेणार भव्य सभा

Supreme Court On Rahul Narvekar | ‘ही शेवटची संधी’, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा ओढले ताशेरे

NCP MLA Rohit Pawar In Pimpri Chinchwad | रोहित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ठोकला शड्डू, म्हणाले – ‘बालेकिल्ला कुठल्या एका नेत्याचा नसतो…’