Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची तोफ मुंबईत धडाडणार, मराठा आरक्षणासाठी घेणार भव्य सभा

जालना : जालन्यातील सभा संपूर्ण राज्यात गाजल्यानंतर आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) मुंबईत धडक देणार आहेत. जालन्यातील सभेचे जोरदार पडसाद उमटले होते. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे १८ ऑक्टोबरपासून राज्यात दुसऱ्या टप्प्यातील दौरा काढणार आहेत. मुंबई, पुणे, बारामती, मावळ, फलटण भागांत त्यांचे दौरे होतील. आम्हाला २४ ऑक्टोबरच्या आत आरक्षण पाहिजे, असा अल्टिमेटम मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मुंबईतील सभेच्या वृत्ताने सत्ताधारी गोटात धडधड सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे येत्या १८ किंवा १९ ऑक्टोबरला शिवाजी मंदिर येथून मराठा समाजाशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून आरक्षण देण्यात यावे, ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणावरील
क्युरेटिव्ह पिटिशन (Curative Petition) स्वीकारण्यास होकार दिलाय. यावर, पुढील ८ दिवसांत आरक्षणाचा पेच
सोडविणार की ठेवणार हा प्रश्न सरकारचा आहे. व्यवसाय आधारित जाती निर्माण झाल्या आहेत.
मराठ्यांचा परंपरागत व्यवसाय शेती असल्यामुळे कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, अशी आमची मागणी आहे.

सत्ताधाऱ्यांना इशारा देताना मनोज जरांगे यांनी म्हटले की, गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ
काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही.
कोणालाही कोपरे गाठू दिले नाही आणि कानात कुजबूज करू दिली नाही. समाजाशी गद्दारी न केल्यामुळे लाखो
लोकांचे पाठबळ मिळत आहे. आंदोलनाचा रथ पुढे गेला आहे. आता मराठा आरक्षणाशिवाय माघार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | दिवे घाटात वाहन चालकाला लुटणाऱ्या निलेश बनसुडे व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 69 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Rahul Narvekar On Sanjay Raut | राहुल नार्वेकरांचे प्रत्युत्तर, ”संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे का, त्यांच्यावर बोलून महत्त्व का द्या?”