NEET 2021 Date : नीट परीक्षा तारीख nta.ac.in वर घोषित, यावेळी 11 भाषांमध्ये होईल परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट 2021 परीक्षेची तारीख घोषित केली आहे. यावेळी ही परीक्षा 1 ऑगस्ट 2021 आयोजित होईल. मेडिकल कॉलेजच्या अंडरग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा एकुण 11 भाषांमध्ये आयोजित केली जाईल.

एनटीएची ऑफिशयल वेबसाइट nta.ac.in वर एमबीबीएस/बीडीएसमध्ये प्रवेशासाठी होणार्‍या नीट परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. नीट 2021 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. नीट परीक्षेत दरवर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थी अर्ज करतात.

एमबीबीएस/बीडीएसमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी नीटची ऑफिशियल वेबसाइट ntaneet.nic.in वर जाऊन प्रवेश परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतील.

नीट परीक्षेत भाग घेणारा उमेदवार 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावा. सोबतच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिशसह 12वी परीक्षा पास असायला हवा. या वर्षी 12वी बोर्ड परीक्षेत भाग घेणारे विद्यार्थी सुद्धा नीट 2021 साठी अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जासोबतच 10वी, 12वीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट नंबर, बँक अकाऊंट डिटेल्स इत्यादी कागदपत्र स्कॅन कॉपी सबमिट करावी लागतील. यासोबतच पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ, सिग्नेचर आणि डाव्या हाताच्या अंगठ्याच्या निशाणीची प्रत सबमिट करावी लागेल.

नीट ची परीक्षा देशातील मान्यता प्राप्त मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज व अन्य संस्थांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते.