म्हणून नीतू सिंग यांनी केली मध्यस्थी

मुंबई : वृत्तसंस्था
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमासोबत गैरवर्तन केल्याची चर्चा होती. सोनम कपूरच्या विवाहसोहळ्यात हा प्रकार घडल्याची माहिती काही प्रसामाध्यमांनी दाखवली.

ऋषी कपूर यांचा चिडका स्वभाव आणि उद्धटपणाची बरीच उदाहरणे आपने ट्विटरवर पाहतोच. त्यातच ‘चिंटू’ साहेबांनी थेट सलमान खानशी पंगा घेतला. सलमानने नीट गळाभेट न घेतल्याच्या रागातून ऋषी कपूरनी सीमा यांच्याशी गैरवर्तन केले.

ही बाब समजताच सलमान खान प्रचंड चिडला होता. सलमान खानने पार्टीमध्ये ऋषी कपूरची शोधाशोध केली, मात्र तोपर्यंत ऋषी कपूर यांनी काढता पाय घेतला होता.अखेर पत्नी नीतू सिंग यांनी मध्यस्थी करत खान मंडळींची माफी मागितली. मात्र दोन कुटुंबांमधले तणावाचे संबंध अद्याप कायम असल्याचे समजते.