Neha Narkhede | कौतुकास्पद ! पुण्याच्या तरुणीची अमेरिकेत उतुंग भरारी, ‘कॉन्फ्लुएंट’ने मारली बाजी

अमेरिका / न्यूयॉर्क : वृत्तसंस्था –  पुण्याच्या एक तरुणीने थेट अमेरिकेत उतुंग भरारी मारली आहे. तर, अमेरिकन शेअर बाजारात आयपीओ (IPO) आल्यानंतर कॉन्फ्लुएंट (Confluent) कंपनीने पहिल्याच दिवशी बाजी मारली. मुख्यतः म्हणजे पुण्यातील (pune) असणारी नेहा नारखेडे (Neha Narkhede) ही या कंपनीची सह-संस्थापक (Co-founder) आहे. आपल्या हिमतीच्या जोरावर टेक्नोक्रॅट अथवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या उद्योजिकेची कथा ही अनेकांना प्रेरणा देते. तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रात भरारी घेणाऱ्या नेहाचं सर्वांनाकडून कौतूक होत आहे. Neha Narkhede | Admirable confluent shares jump 25 in ipo neha narkhede baking co founder new cloud computing billionaires

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अमेरिकेतल्या नॅस्डॅक (US Nasdaq) या शेअर बाजारात कॅलिफोर्नियातील कॉन्फ्लुएंट (Confluent IPO) कंपनीचे 24 जून या दिवशी लिस्टींग झालं.
तर कंपनीच्या एका शेअरची 36 डॉलर्स होती.
ती सध्या 25 टक्क्यांनी वाढून शेअर्सची किंमत 45.02 डॉलर एवढी झालीय.
या कंपनीने IPO द्वारे 828 दशलक्ष डॉलर उभा केले आहे.
त्याचं मुल्याकंन 9.1 अब्ज डॉलर झालंय. तर, कॉन्फ्लुएंटचे को- फाऊंडर जय क्रेप्स (Jay Crepes), नेहा नारखेडे (Neha Narkhede) आणि जून राव (Jun Rao) हे तिघे लिंक्डइन या
प्रसिद्ध आणि व्यापक प्रोफेशनल नेटवर्क कंपनीचे कर्मचारी होते.

‘लिंक्डइनवर प्रचंड प्रमाणात येणारे मेसेजेस, नेटवर्क रिक्वेस्ट्स आणि प्रोफाइल व्ह्यूज यांच्या
व्यवस्थापन सोपे करण्यासाठी त्यांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेलं एक टेक्निकल टूल (Technical tools) 2011 रोजी विकसित केलं.
मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या एवढ्या प्रचंड डेटाचं व्यवस्थापन (Data Management) लिंक्डइन सह अन्य कंपन्यांसाठी देखील मोठी समस्या असू शकते हे तिघांना समजलं.
त्यावेळी त्यांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित ओपन सोर्स सॉफ्टवेअर (Open Source Software) निर्माण केलं. 2014 मध्ये त्याकरिता कॉन्फ्लुएंट (Confluent) नावाची कंपनी उभारली.
नेहा नारखेडे ही त्या कंपनीची सहसंस्थापक आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहे.

दरम्यान, साधारण आठ वर्षाची असल्यापासून नेहाला (Neha Narkhede) कॉप्युटरची आवड आहे.
आणि ती तेव्हापासून हाताळत आहे. भारतात असताना तिने तंत्रज्ञान क्षेत्रातला अभ्यास
करण्याचं ठरवलं. अमेरिकेतील जॉर्जिया युनिव्हर्सिटीतून (University of Georgia) 2006 मध्ये तिने
कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली.
नेहाच्या जोरदार कामगिरीमुळे तिची लिंक्डइन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर (Software engineer) म्हणून निवड झाली. तेथे दोन सहकाऱ्यांसोबत नेहाने कॉन्फ्लुएंट कंपनीची स्थापना केली.
कॉन्फ्लुएंट या कंपनीचे आजचे भांडवली बाजारमूल्य 11.4 अब्ज डॉलर झालेल्या या कंपनीच्या 3 को-फाऊंडरपैकी दोघे अब्जाधीश झाले.
तर तिसरी सह-संस्थापक नेहा नारखेडे (Co-founder Neha Narkhede) ही तरुणी देखील अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे.

Web Title : Neha Narkhede | Admirable confluent shares jump 25 in ipo neha narkhede baking co founder new cloud computing billionaires

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nagpur Police News | SPU मधील पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ