नेटफ्लिक्समध्ये आता स्वत: हून डाउनलोड होतील चित्रपट आणि TV सीरिज, जोडले गेले हे नवीन फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेटफ्लिक्सने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. ‘डाउनलोड्स फॉर यू’ असे या फिचरचे नाव आहे. या फिचरनूसार कंटेन्ट ऑटो डाउनलोड होईल. ऑटो डाउनलोड फिचर युजरच्या निवडीवर अवलंबून असेल. हे आपल्या आवडीनुसार ते काम करेल. दरम्यान हे फिचर सध्या केवळ अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. वापरकर्ते डाउनलोड केलेले चित्रपट किंवा शो जवळपासच्या टीव्हीवर कास्ट देखील करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार लवकरच आयओएस उपकरणांवर या फीचरची चाचणी सुरू केली जाईल. हे फिचर वापरण्यासाठी, डाउनलोड टॉगल ऑन करावे लागेल.

डाउनलोड्स फॉर यू फीचरला अ‍ॅक्सेस करण्यासाठी डाउनलोड टॅबवर जा. तेथे डाउनलोड फॉर यू टॉगल ऑन करा. यानंतर, आपण आपल्या सोयीनुसार स्टोरेज निवडा. यामध्ये आपण डिसाइड करू शकता कि, नेटफ्लिक्स किती स्टोरेजचा कंटेन्ट आपल्या डिव्हाइसवर डाउनलोड करेल. रेकमेंडेड डाउनलोडसाठी, आपण 1 जीबी, 3 जीबी किंवा 5 जीबी निवडू शकता. मग आपले डिव्हाइस डाउनलोड्स आपले डिव्हाइस वायफायशी कनेक्ट होताच शो किंवा चित्रपट स्वयंचलितपणे डाउनलोड होईल.

माहितीनुसार, सुरुवातीला हे फिचर शोच्या सुरुवातीचे काही भाग डाउनलोड करेल. वापरकर्ते जवळपासच्या टीव्हीवर डाउनलोड केलेला कन्टेंट पाहू शकतात. जिथे शो थेट त्यांच्या फोनवरून स्ट्रीम होईल. नेटफ्लिक्स त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांच्या नेटफ्लिक्स वॉच हिस्ट्रीमधून काय पहायचे आहे ते ठरवेल. हे युजरला सजेशन दाखविण्यापेक्षा जास्त सोपे आहे. अधिक ऑफलाइन कंटेन्ट पाहू इच्छित वापरकर्त्यांसाठी डाउनलोड फॉर यू फीचर उपयुक्त ठरेल. दरम्यान, लायसन्स रिस्ट्रिक्शन असलेली काही टायटल डाउनलोडसाठी उपलब्ध नाहीत.

नेटफ्लिक्सने तीन वर्षांपूर्वी स्मार्ट डाउनलोड फीचरदेखील लाँच केले. ज्याद्वारे वेळ वाचवण्यासाठी पुढील भाग डाउनलोड करण्याची सुविधा वापरकर्त्यांकडे होती. ज्यात पूर्वी पाहिलेले भाग काढले जातात. हे फिचर केवळ वायफायसह कार्य करते. ज्यासाठी आपण नेटफ्लिक्स अ‍ॅप डाउनलोडमध्ये जाऊन स्मार्ट डाउनलोडवर जाऊन हे ऑन करू शकता.