Netflix अँड्राईड युजर्ससाठी आणतोय नवं फिचर्स; वाचा काय आहे ते…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Netflix ने अँड्राईड डिव्हाईससाठी एका नव्या फिचर्सचे टेस्टिंग सुरु केले आहे. त्यानुसार OTT प्लॅटफॉर्म एक स्लीप टायमर बटण ऍड करण्याच्या तयारीत आहे. यामुळे युजर्सला नेटफ्लिक्सवर टीव्ही शो आणि चित्रपटासाठी टाईम सेट करता येऊ शकेल.

नेटफ्लिक्सच्या माध्यमातून अँड्राईड युजर्ससाठी या नव्या फिचर्सचे ग्लोबल टेस्टिंग केले जात आहे. याबाबतची माहिती ‘द वर्ज’च्या सूत्रांकडून मिळाली आहे. युजर्सच्या फिडबॅकनुसार नेटफ्लिक्सच्या साहाय्याने या फिचर्सचा विस्तार TV, डेस्कटॉप आणि iOS साठीही केला जाणार आहे.

याशिवाय सध्या अनेक ऍडल्ट प्रोफाईल्सपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले आहे. म्हणजेच किड्स प्रोफाईलमध्ये हे फिचर्से सध्या मिळणार नाही. तसेच युजर्सला सिलेक्ट करण्यासाठी चार टायमर ऑप्शनही देण्यात आले आहेत. 15 मिनिटे, 30 मिनिटे, 45 मिनिटे आणि कोणत्याही टीव्ही शो किंवा चित्रपटाच्या शेवटपर्यंतचा पर्याय देण्यात येणार आहे. पण सिलेक्ट केलेल्या कालावधीपर्यंत पोहोचल्यानंतर नेटफ्लिक्स बंद होईल.

तसेच नेटफ्लिक्स टायमर बटणाला स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला देण्यात आले आहे. हे आपोआप बंद होईल. युजर्स चार टाईमच्या पर्यायापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. याशिवाय यातील विशेष असा फायदा म्हणजे नेटफ्लिक्स प्रत्येक पर्यायासह टीव्ही शो किंवा चित्रपट संपण्याची वेळ दाखवेल.