Coronavirus : चीनच्या Wuhan लॅबमध्ये कोरोनापेक्षा अधिक धोकादायक व्हायरस अस्तित्वात, तांदूळ अन् कापसातून गुढ उकलले

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात पुन्हा एकदा कहर सुरू केला आहे. तर आणखी एक भितीदायक बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरस इतकाच भयंकर आणखी एक व्हायरस लवकरच जगाला त्रस्त करू शकतो. संशोधकांच्या एका टीमने दावा केला आहे की चीनच्या वुहानमध्ये अजूनही अनेक प्रकारचे नवीन आणि जास्त धोकादायक व्हायरस आहेत. शास्त्रज्ञांनी हा दावा वुहान आणि चीनच्या इतर शहरांच्या कृषी प्रयोगशाळांमधून मिळालेले तांदूळ आणि कापसाच्या जेनेटिक डेटाच्या आधारावर केला आहे.

जग एका मोठ्या संकटाकडे
एकीकडे लोक कोरोनाच्या लाटेने अस्वस्थ आहेत, अशावेळी शास्त्रज्ञांचा हा दावा खरा असेल तर चीनकडून जगातील आणखी एक संकट मिळू शकते. हा व्हायरस जास्त धोकादायक ठरू शकतो कारण कृषी प्रयोगशाळांमध्ये मेडिकल रिसर्च सेंटर किंवा वायरॉलॉजी लॅबप्रमाणे मजबूत सुरक्षा व्यवस्था नसते.

हे संशोधन एआरएक्सआयव्ही नावाच्या प्रीप्रिंट सर्व्हरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, चीनच्या वुहान आणि अन्य शहरांच्या कृषी प्रयोगशाळांमध्ये मनुष्याला नुकसानकारक अनेक धोकादायक व्हायरस आहेत. जर यांना सुद्धा सुरक्षित प्रकारे नियंत्रित करण्यात आले नाही तर जग एका मोठ्या संकटात सापडू शकते.

तांदूळ आणि कापसाचे जेनेटिक सिक्वेन्स
एआरएक्सआयव्हीवर प्रकाशित या रिपोर्टला जरी सध्या एखाद्या अकॅडमिक जर्नल किंवा एखाद्या एक्सपर्टने मान्यता दिलेली नसली, तरी हे संशोधनक धक्कादायक आवश्य आहे. शास्त्रज्ञांनी कृषी प्रयोगशाळांमधील तांदूळ आणि कपाशीच्या जेनेटिक सिक्वेन्सचा 2017 ते 2020 च्या दरम्यानचा डेटा घेतला आहे. हा डेटामध्ये येथील नवीन व्हायरसची पूर्ण माहिती आहे, जी मर्स आणि सार्सशी संबंधित आहे.

चीनी सरकारने दावा नाकारला
हैराण करणारी बाब ही आहे की, सर्व जेनेटिक डेटा वुहान इन्स्टीट्यूट ऑफ वायरॉलॉजीमधून काढण्यात आला होता. ज्याबाबत अजूनही जगाला संशय आहे की, याच लॅबमधून कोरोना व्हायरस कोविड-19 महामारी चुकीने पसरली. मात्र, चीनचे सरकार सातत्याने यास नकार देत आले आहे. तरी सुद्धा जगभरातील शास्त्रज्ञांना या लॅबवर संशय आहेच.