New Tax Rule | जीवन विमा पॉलिसीमधून मिळणाऱ्या रकमेवर लागणार टॅक्स, परंतु असा मिळेल दिलासा, जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : New Tax Rule | सामान्यपणे टॅक्सपेयर्स लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये (Life Insurance Policy) गुंतवणूक (Investment) ही टॅक्स वाचवण्याच्या हेतुने करतात. परंतु, नवीन नियमांमुळे (New Tax Rule) आता हे इतके सोपे राहिलेले नाही. कारण, जर जीवन विमा पॉलिसीवर वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम भरला जात असेल तर तिच्या रिटर्नला उत्पन्नाचा भाग मानले जाईल आणि त्यावर इन्कम टॅक्स (Income Tax) द्यावा लागेल.

जर तुमच्याकडे जीवन विमा पॉलिसी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे, कारण जर लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर यातून मिळणाऱ्या रिटर्नवर इन्कम टॅक्स द्यावा लागेल. बजेटमध्ये सरकारने ही घोषणा केली होती. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes) याबाबत प्राप्तीकर कायदा नोटिफाय केला आहे.

या नोटिफिकेशनमध्ये इन्कम टॅक्सच्या १६व्या दुरूस्तीचा संदर्भ देत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने म्हटले की, कायदा ११यूएसीए नुसार, १ एप्रिल २०२३ अथवा त्यानंतर जारी झालेली पॉलिसी आणि ज्यांच्या प्रीमियमची रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना हा नियम लागू होईल. (New Tax Rule)

सीबीडीटीने हे सुद्धा स्पष्ट केले की, जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॉलिसीज असतील तर सर्व पॉलिसीच्या प्रीमियमची बेरीज केली जाईल. जर प्रीमियमची रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मॅच्युरिटीवर जो रिटर्न मिळेल, तो पूर्णपणे टॅक्स फ्री असेल.

प्राप्तीकराच्या सेक्‍शन १०(१०डी) अंतर्गत विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर (Insurance Policy Maturity) मिळणाऱ्या
रक्कमेवर इन्कम टॅक्‍सची सूट मिळते. परंतु, आता जर प्रीमियमची रक्कम ५ लाखापेक्षा जास्त असेल तर
तिच्या मॅच्युरिटीवर मिळालेला पैसा इन्कम टॅक्सच्या कक्षेत येईल.

बजेट २०२३-२४ मध्ये लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीज संबंधी टॅक्स नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा करण्यात आली होती.
मात्र, नवीन नियम यूनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लान (Unit Linked Insurance Plan) म्हणजे यूलिप प्लानवर लागू
होणार नाहीत. याशिवाय, जर मॅच्युरिटीच्या अगोदर विमाधारकाचा मृत्यू झाला तरीसुद्धा त्याची पूर्ण रक्कम
टॅक्सच्या कक्षेच्या बाहेर असेल. जरी प्रीमियम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.

तरीही, हा नवीन नियम त्या लोकांना अडचणीचा आहे जे टॅक्स वाचवण्यासाठी लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी घेतात.
कारण, आता मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम टॅक्सेबल असेल. अशावेळी टॅक्समध्ये बचत करणे सोपे नसेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

21 August Rashifal : वृषभ, मकर आणि कुंभ राशीवाल्यांना भासू शकते पैशाची चणचण, जाणून घ्या दैनिक राशीभविष्य

Gram & Raisins | हरभरे आणि हे ड्रायफ्रूट खा, आरोग्याचे होतील 5 मोठे फायदे, हाडे होतील मजबूत, जाणून घ्या पद्धत