२१ जानेवारीला दिसणार नवीन वर्षाचा पहिला ‘सुपरमून’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्र पृथ्वीभोवती लंबवतूर्ळाकार मार्गाने फिरत असतो. त्यामुळे तो महीन्यातून एकदा पृथ्वीच्या जवळ येतो व एकदा दूर ही जातो. मात्र ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून वाजवीपेक्षा कमी अंतरावर येतो. त्यावेळेस चंद्राचे बिंब नेहमीच्या पोर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठे दिसते. अशा चंद्राला ‘सुपरमून’ असे म्हणतात. साधारणत: १२ महिन्याच्या कालचक्रात चार ते सहा सुपरमूनचे योग येतो. मागील वर्षी २ जानेवारीला हा योग आला होता. तर यावर्षी २१ जानेवारीला सुपरमुन दिसणार आहे. १९ फेब्रुवारी व २१ मार्च रोजी पुन्हा ‘सुपरमून’चे योग आहेत. या तीनही सूपरमून मध्ये १९ फेब्रूवारीचा सूपरमून मोठा राहील.

‘नमो अ‍ॅप’वरील ‘या’ प्रश्नामुळे भाजपा खासदारांची उडाली भंबेरी 

चंद्राच्या आकर्षणाने समुद्राच्या पाण्याला नेहमी भरती येते. यावेळेस पाण्यावर मोठ मोठ्या लाटा उसळतात. २१ जानेवारीला चंद्र पृथ्वीपासून न्यूनतम अंतरावर येणार असल्यामूळे यावेळेस नेहमीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता राहील. या दिवशी जागतीक वेळेनुसार पहाटे ५ वाजून १७ मिनिटांनी चंद्र, पृथ्वी पासून किमान अंतरावर येईल. यावेळी हे अंतर ३ लाख ५७ हजार ३४४ कि.मी राहील. या बिंदूवर चंद्र जवळ जवळ २२ मिनिटे पर्यत राहील व तो नेहमीच्या चंद्रापेक्षा ३० टक्के अधिक तेजस्वी व आकारमानात १४ टक्के मोठा दिसेल. चंद्र पृथ्वीपासून जवळ असतांनाचा आकार व दुर असतांनाचा आकार यात सूक्ष्म फरक असतो. त्यामुळे चंद्राच्या आकारात होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. मात्र शास्त्रज्ञ विशेष फोटोग्राफीच्या माध्यमातून चंद्राच्या आकारातील बदल लक्षात घेऊ शकतात.

सुपरमून या शब्दाची व्याख्या खगोलशास्त्रातली नाही. सुपरमून हा शब्द ‘रिचर्ड नोले’ या फलज्योतीष्यवाल्याने १९७९ मध्ये प्रचारात आणला.