Pimpri News : महिलेच्या बदनामीकारक चिठ्ठ्या चिटकविण्याचा किवळेत प्रकार

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमाच्या आणा भाका घेणारे पोस्टर चिटकवून शहरात खळबळ निर्माण करणारी पोस्टर यापूर्वी लागलेली आपण पाहिली होती. ती एका नाटकाची जाहिरात असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. परंतु, एका तरुणाने आपल्याबरोबर ही महिला ७ वर्षे रखेल म्हणून रहात होती. अशा चिठ्ठ्या लिहून या किवळे गावात विविध ठिकाणी चिटकविल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी अमोल दिलीप नांगरे (रा. वाळवा, जि़ सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका महिलेने हातकणंगले पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तेथून ती देहुरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. आरोपीने या महिलेची बदनामी करणारा स्वत: चा एक व्हिडिओ बनवून तिच्या नातेवाईकांना पाठविला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल नांगरे हा फिर्यादीच्या सावत्र आईचा नातेवाईक आहे. फिर्यादी व आरोपी हे २०१७ पासून २४ डिसेंबर २०२० पर्यंत किवळे येथे एकत्र राहत होते. नांगरे याने फिर्यादीला तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकी देऊन तिच्याबरोबर वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. २४ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी यांच्या मुलीची तब्येत बिघडल्याने त्या तिला पाहण्यासाठी मुळ गावी गेल्या. तेव्हा आरोपीही वठार येथे आला.

फिर्यादीला तु पुण्यात माझ्याबरोबर आली नाही तर तुझी बदनामी करणारा व्हिडिओ प्रसारीत करेल, अशी धमकी दिली. पण फिर्यादी या त्याच्याबरोबर आल्या नाहीत. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या बहिणीच्या मोबाईलवर फोन करुन फिर्यादी यांना तू माझ्यापासून दूर गेलीस तर तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी दिली.

त्यानंतर त्याने फिर्यादी यांची बदनामी करणारा स्वत:चा व्हिडिओ बनवून फिर्यादीच्या नातेवईकांना पाठविला. तसेच फिर्यादी या अमोल नांगरेची ७ वर्षे रखेल होती. पुण्यात आता परत आली, असे लिहिलेल्या कागदाचा एक गठ्ठा फिर्यादीचे घराजवळील विजेच्या खांबा खाली टाकून तसेच ठिकठिकाणी चिटकवून बदनामी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गावडे अधिक तपास करीत आहेत.