गुलाबी थंडीत साहित्य संमेलन : ग्रंथदिंडी आणि शोभायात्रेनं शुभारंभ, विविध देखाव्यांनी साहित्य रसिकांची जिंकली मने

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाला शुक्रवार १० जानेवारी २०२० रोजी सकाळी गुलाबी थंडीत ग्रंथदिंडीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ग्रंथदिंडीचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे कौतुकराव ठाले – पाटील, जिल्हा परिषदचे सीईओ संजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आले.

शुक्रवारी सकाळी १० वाजता श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलामधुन ग्रंथदिंडी व शोभा यात्रेस मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. सकाळचे १० वाजले असताना देखील गुलाबी थंडीचा वारा वाहत असल्याने उपस्थितीमध्ये एक प्रकारचे वेगळे चैतन्य निर्माण झाले होते. विविध वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले विद्यार्थी, सामाजिक संदेश देणारे देखावे, टाळ – मृदंगाचा गजर, विद्यार्थ्यांबरोबर तरुण, नागरिक, देशभक्तिपर देखाव्यांच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करण्यात आले. या शोभायात्रेत आ. विक्रम काळे, जि.प.च्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील, जि. प. चे सीईओ संजय कोलते, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव – ठाले पाटील, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, यांच्यासह मान्यवर सहभगी झाले होते.

साहित्य – रसिकांची जिंकली मने
ग्रंथदिंडी व शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध देखावे, छत्रपती शिवाजी महाराज, संत गोरोबाकाका, संत गाडगेबाबा, बाल वारकरी, महिलांचे ढोल पथक, लेझीम पथक, मुलींचे बॅंण्ड पथक आदी मोठया संख्येने सहभागी होते. पुर्ण शहरात या शोभायात्रेमुळे एक प्रकारचे उत्साहाला उधान आले हेाते. प्रस्तुत करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी साहित्य – रसिकांची मने जिंकली. जवळपास तीन किलोमीटरचे अंतर पूर्ण करून ग्रंथदिंडीचे संमेलनस्थळी आगमन झाले.

देखाव्यांवर पुष्पवृष्टी
जिल्हयातील विविध शाळेतुन शिक्षक, शिक्षकांनी आपआपल्या पथकासोबत ते शहरात दाखल झाले होते. ग्रंथदिडी व शोभायात्रेस प्रारंभ झाल्यानंतर समता नगर, आनंदनगर, पोलिस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हॉटेल अंबाला, आर्य समाज चौक त्यानंतर साहित्य संमेलनस्थळी ग्रंथदिंडी व शोभायात्रा पोहचली. शोभायात्रा व ग्रंथदिंडी शहराच्या विविध भागातून जात असताना रस्त्यावर लोकांनी त्याच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढून त्यात विविध रंगांची उधळन केली होती. तेर कांही भागात ग्रंथदिंडी व संताच्या देखाव्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

साहित्य संमेलनाचे ध्वजारोहन
संमेलनाला जिल्हाभरातूननागरिकांची आणि विद्यार्थ्यांची, साहित्यप्रेमीं, साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या शोभायात्रेमध्ये अनेक चित्ररथही सहभागी झाले होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी , जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे, मावळत्या अध्यक्षा अरूणा ढेरे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, रवी केसकर, माधव इंगळे, दादा गोरे आदींची उपस्थित होती. त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/