
Nilesh Rane | रत्नागिरी हातिवले टोल नाक्यावर निलेश राणे आक्रमक
रत्नागिरी : रत्नागिरीमधील हातिवले टोलनाक्यावर होणाऱ्या टोलवसुलीला माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी गुरुवारी विरोध केला. या टोलनाक्यावर निलेश राणे आक्रमक झाले होते. राजापूर तालुक्यात महामार्गाचे काम अपूर्ण असून देखील प्रशासन अनधिकृतपणे हातिवले गावात टोल वसुली करत आहे, असा दावा निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला आहे.
गुरूवारी निलेश राणे आपल्या समर्थकांसह हातिवले टोलनाक्यावर आंदोलनाच्या पवित्र्यात पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल देखील सुनावले. काम पूर्ण होईपर्यंत टोल भरला जाणार नाही, अशी भूमिका यावेळी राणेंनी मांडली. राणे यांचा काही काळ अधिकाऱ्यांसोबत वाद देखील झाला. राणे अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्ही तुमचे कर्तव्य बजावत आहात, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण रस्त्याचे काम अर्धवट झाले असताना, तुम्ही टोल वसूल करत आहात. हे योग्य नाही. तुम्ही योग्य रितीने तुमचे कर्तव्य बजावत नाही. आम्हाला उगाचच संघर्ष करण्यास भाग पाडू नका. काम पूर्ण झाल्यावरच काय तो टोल वसूल करा. तत्पूर्वी टोल देण्यास आमचा विरोध आहे.
माझ्यासाठी महामार्ग म्हणजे महामार्गच आहे. एका बाजूच्या रस्त्याचे 50 किमी काम झाले. मग दुसऱ्या बाजूच्या कामाचे काय? ठेकेदाराला दिलेल्या कंत्राटामध्ये तुम्ही टोल मोडू नका. मी पुन्हा एकदा सांगत आहे, की वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय द्या, असेही राणे (Nilesh Rane) यावेळी म्हणाले.
दरम्यान, निलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. राणे म्हणाले, कोणालाही विश्वासात न घेता
हा टोल सुरु करण्यात आला होता. बुधवारी काही वेळासाठी आमच्या लोकांनी हा टोल बंद देखील पाडला होता.
रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे टोल बंद करण्याची मागणी आम्ही केली.
तसेच स्थानिकांच्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नसताना, हा टोल सुरु करण्यासाठी प्रशासन इतकी घाई
कशासाठी करत आहे? अधिकाऱ्यांकडे टोल सुरु करण्यासंबंधी कोणतीही कागदपत्रे देखील नाहीत.
टोल थांबवत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरुन हटणार नाही. असा पवित्रा राणे यांनी घेतला होता.
Web Title :- Nilesh Rane | bjp nilesh rane protest with supporters at ratnagiri hatavli toll naka
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Malaika Arora | अरहान खानला वाटते आई मलायकापेक्षा ‘ही’ व्यक्ती अधिक जवळची…