NIMI Recruitment 2021 । नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिटयूटमध्ये होणार पदभरती, 35 ते 45 हजारांपर्यंत पगार

चेन्नई : वृत्तसंस्था – NIMI Recruitment 2021 । चेन्नईतील नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिटयूटमध्ये (National Instructional Media Institute) लवकरच पदभरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नोकरीची (NIMI Recruitment 2021) मोठी संधी आहे. सल्लागार (consultant) या पदासाठी ही भरती असणार आहे. NIMI कडून एकूण 318 जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज (Apply online) करायचे आहेत.

पदे आणि जागा –
कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार – 240

तांत्रिक सहाय्य सल्लागार – 48

आयटी समर्थन सल्लागार – 30

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार – संबंधित क्षेत्रात पदवी अथवा पदविका अभ्यासक्रम

तांत्रिक सहाय्य सल्लागार – अभियांत्रिकी पदवी / पदविका / BBA / MBA

IT समर्थन सल्लागार – संगणक विज्ञान अथवा IT मध्ये BE / BTech / MTech.

वेतन –
कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार – 35,000 /- प्रतिमहिना

तांत्रिक सहाय्य सल्लागार – 45,000 /- प्रतिमहिना

आयटी समर्थन सल्लागार – 45,000 /- प्रतिमहिना

निवड प्रक्रिया –
– उमेदवाराला कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. ती 120 गुणांची असेल. याव्यतिरिक्त अनुभवावर गुण देखील दिले जातील. अधिकाधिक 5 वर्षांच्या अनुभवासाठी 20 गुण दिले जातील. कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार पदासाठी 100 गुणांची चाचणी असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2021

अर्ज करण्यासाठी वेबसाईट – https://nimi.gov.in/index.htm

Web Title :- NIMI Recruitment 2021 | national instructional media institute recruitment 2021 openings for consultants post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल