2021च्या सुरुवातीला Tesla ची भारतात Entry, केंद्रीय मंत्री गडकरी यांची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  इलेक्ट्रीक कार क्षेत्रात कार्यरत असलेली अमेरिकन कंपनी टेस्ला भारतामध्ये 2021च्या सुरुवातीस विक्रीबरोबरच आपले कामकाज सुरू करणार असल्याचे केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Transport and Road Transport Minister Nitin Gadkari) यांनी सांगितले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी सोमवारी (दि. 28) बोलत होते. यावेळी चर्चा करताना गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर देखील भाष्य केले. गडकरी म्हणाले की, अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्यांवर काम करत आहेत. ज्यांच्या गाड्यांची किंमती कमी होऊ शकते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या टेस्ला फार प्रगत आहे. टेस्ला विक्रीबरोबरच आपल्या कामकाजाला सुरुवात करणार आहे. यानंतर कारच्या बाबतीत लोकांचा प्रतिसाद पाहून ते गाड्यांच्या असेम्बल आणि उत्पादनासंदर्भात विचार करतील. एवढेच नाही, तर आगामी पाच वर्षांत भारत क्रमांक एकचे मॅन्युफॅक्चरिंग हब होईल, असेही ते म्हणाले.

अहवालानुसार, जगातील सर्वात व्हॅल्यूड ऑटोमोबाईल कॉर्पोरेशनने मार्केट कॅपनुसार पुढील महिन्यात बुकिंग पुन्हा सुरू करण्याचे आणि 2021-22 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी डिलिव्हरी देण्याच्या योजनांना सील केले आहे. मस्कने ऑक्टोबर महिन्यात ट्विट केले होते, की 2021 मध्ये टेस्ला भारतात लॉन्च होईल. टेस्लाची देखील देशात आर अँड डी सेंटर आणि बॅटरी उत्पादक कंपनी उघडण्याची योजना आहे. तथापि, कंपनीने 2016 मध्येच मॉडेल 3 च्या प्री-बुकिंग सुरू करत भारतात प्रवेश करण्याची योजना केली होती.