Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन; दाऊदच्या नावे फोन करून केली खंडणीची मागणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या नावाने हा फोन आल्याची माहिती आहे. यात दाऊदच्या नावे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे खंडणी देखील मागण्यात आली आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयाला हा धमकीचा फोन प्राप्त होताच नागपूर पोलिसांबरोबरच एटीएस, एएनओसह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानावर आणि खमल्यातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला धमकी मिळाल्याच्या वृत्ताला पोलिस आणि जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधींनी दुजोरा दिला.

सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज (दि. १४) सकाळी साडेअकरा वाजता एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच फोन कट केला. फोन स्विकारणाऱ्याने लगेच ही माहिती पक्षातील वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी अर्ध्या तासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयाला वेढा घातला. तसेच दहशतवादी विरोधी पथक आणि नक्षलवादविरोधी पथक या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वर्धा रोडवरील घर
आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयाच्या समोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
याठिकाणी शस्त्रधारी पोलिसांची तुकडी देखील तैनात करण्यात आल्याची माहिती नागपूरचे
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. नितीन गडकरी यांच्या घराकडे व कार्यालयाकडे जाणारे रस्ते
खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आले असून नागपूर पोलिसांकडून बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक
देखील सज्ज ठेवण्यात आलं आहे.

Web Title :- Nitin Gadkari | death threat to nitin gadkari two crore ransom demanded in the name of dawood

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या पुणे पोलिसांना सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पारितोषिक

Shriya Pilgaonkar | अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या मराठमोळ्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष