Nitish Bharadwaj- IAS Smita Gate | 12 वर्षांनंतर टीव्हीवरील ‘श्री कृष्ण’ नितीश भारद्वाज यांचं दुसरे लग्नही मोडलं, पत्नी स्मिता IAS अधिकारी

पोलीसनामा टीम ऑनलाइन  Nitish Bharadwaj-Smita Gate | ऐतिहासिक टेलिव्हिजन शो ‘महाभारत’ (Mahabharat) मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) पत्नी स्मिता यांच्यापासून वेगळे झाले आहेत. स्मिता या आयएएस अधिकारी (IAS Smita Gate) आहेत. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत त्या इंदूरमध्ये स्मितासोबत राहतात. दोघांनी 2019 मध्ये घटस्फोटाची केस दाखल केली होती. (Nitish Bharadwaj- IAS Smita Gate)

नितीश आणि स्मिता यांचे 2009 मध्ये लग्न झाले आणि दोघांना दोन मुली आहेत. नितीश यांनी अलीकडेच बॉम्बे टाईम्सशी संवाद साधला आणि सांगितले, ‘होय, मी सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी ( Divorce Application ) अर्ज केला होता. आम्ही का वेगळे झालो याच्या कारणांबद्दल मला बोलायचे नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. मी एवढेच म्हणू शकतो की कधी कधी घटस्फोट मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायक असू शकतो.’ नितीश आणि स्मिता या दोघांचे हे दुसरे लग्न असल्याची माहिती आहे. (Nitish Bharadwaj- IAS Smita Gate)

लग्नाबाबत बोलताना नितीश म्हणाले की, त्यांचा लग्नावर विश्वास आहे पण या बाबतीत त्यांचे नशीब चांगले नव्हते. याबद्दल अभिनेता म्हणाला, ‘सामान्यतः लग्न तुटण्याची अनंत कारणे असू शकतात, काहीवेळा हे कट्टर वृत्तीच्या अभावामुळे होते किंवा अहंकार आणि स्वकेंद्रित विचारसरणीचा परिणाम असू शकतो. पण जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे मुलांवर याचा कमीत कमी नकारात्मक परिणाम होईल याची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे.

 

स्मिताच्या आधी नितीशने 1991 मध्ये मोनिषा पाटीलसोबत लग्न केले आणि दोघांना दोन मुले झाली.
एक मुलगी आणि एक मुलगा पण दोघांचा 2005 साली घटस्फोट झाला.

Web Title : Nitish Bharadwaj- IAS Smita Gate | mahabharat fame nitish bharadwaj
separated from wife IAS officer smita gate after 12 years of marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या