एका व्यक्तीला व्हॅक्सीनचे वेगवेगळ डोस देण्याचं प्रकरण, जाणून घ्या आरोग्य मंत्रालयानं काय सांगितलं

नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले की हे अश्वासक आहे की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत घसरण झाली आहे आणि वेळ येताच प्रतिबंध व्यवस्थित प्रकारे खुले केले गेल तर हा पुढेही कायम राहील. त्यांनी म्हटले की, दुसरी लाट कमी होत असताना व्हॅक्सीनेशनचा दर वाढत आहे. यास आणखी वेग द्यावा लागेल. उत्तर प्रदेशात चुकीने एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या व्हॅक्सीन (corona vaccine) दिल्या गेल्याव, यावर व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, आमचा प्रोटोकॉल स्पष्ट आहे की, दिलेले दोन्ही डोस एकाच व्हॅक्सीनचे (corona vaccine)  असावेत. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जर असे झाले जरी असले तरी चिंतेचा विषय नाही. दुसरी व्हॅक्सीन (corona vaccine)  दिली गेली तरी काही अडचण नाही.

आणखी इतर कंपन्यांच्या व्हॅक्सीनबाबत व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, सरकार परदेशी कंपन्यांच्या संपर्कात आहे. मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया आमची प्राथमिकता आहे. सध्या अनेक व्हॅक्सीन सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.

फायजर कंपनीच्या व्हॅक्सीनबाबत डॉक्टर पॉल म्हणाले, आम्ही फायजरच्या संपर्कात आहोत. कारण त्यांनी येत्या महिन्यात जुलैमध्ये व्हॅक्सीन ठराविक प्रमाणात उपलब्ध करण्याचा संकेत दिला आहे.

Also Read This : 

 

नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल, म्हणाले – ‘सरकार स्थिर, मग तुमचे मालक घरात 5 तास कशासाठी महायज्ञ करतायेत?’

 

Black fungus early symptoms : कोरोनाच्या रिकव्हरीत ‘या’ 7 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, जाणून घ्या

 

धक्कादायक ! मास्क घातलं नाही म्हणून हातापायाला खिळे ठोकले, युवकाचा पोलिसांवर गंभीर आरोप