पती-पत्नीला अमेरिकेत नोकरी नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचा फतवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ट्रम्प सरकार एच-वन बी व्हिजा धारकाच्या पती -पत्नीसाठी अमेरिकेत कायदेशीर काम करण्यासाठी बंदी आणण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम भारतीयांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या संघीय एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लाॅ मेकर्सला या संदर्भातील माहिती दिली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम 70 हजारावरून अधिक ‘एच-4 व्हिजा’ धारकांवर होणार आहे. ज्या लोकांना या ठिकाणी वर्क परमिट मिळाले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसापासून सतत एच- वन बी व्हिजासाठी असणारे नियम अधिक कडक करण्याच्या प्रयत्नात आहेत.
एच-1 बी व्हिजा घेऊन अमेरिकेत काम करण्यासाठी दाखल झालेल्या व्यक्तींच्या जोडीदाराला हा व्हिजा दिला जातो. यामध्ये सर्वात जास्त संख्या भारतीय पती-पत्नीची आहे. ओबामा सरकारच्या कालावधीत लागू करण्यात आलेला निर्णय ट्रम्प सरकार बदलण्याच्या तयारीत आहे.