“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | पहिली ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; सेंन्च्युरी क्रिकेट क्लब, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – “Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत सेंन्च्युरी क्रिकेट क्लब आणि क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी या संघांनी अनुक्रमे २२ यार्ड्स क्लब आणि ननावरे स्पार्ट्स फाऊंडेशन या संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाचा दिवस गाजवला. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे झालेल्या सामन्यात गौरव खैरे याच्या अष्टपैलू खेळीमुळे सेंन्च्युरी क्रिकेट क्लबने २२ यार्ड्स क्लबचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना २२ यार्ड्स क्लबने ११७ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये खुश पाटील (३१ धावा) आणि वैंकटेश्‍वर चव्हाण (३० धावा) यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली. केदार बजाज आणि गौरव खैरे यांनी अचूक गोलंदाजी करून २२ यार्ड्सचा डाव नियंत्रित केला. सेंन्च्युरी क्रिकेट क्लबने हे आव्हान १६.१ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. गौरव खैरे याने ३४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६१ धावांची खेळी साकारली व संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

मनलिव सिंग घई याच्या ९६ धावांच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने ननावरे स्पार्ट्स फाऊंडेशनचा ४० धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने १७४ धावांचे आव्हान उभे केले. मनलिव सिंग घई याने ६८ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९६ धावा फटकावल्या. युसफ मेमन यानेसुद्धा ४७ धावांची खेळी केली. या दोघांनी १०१ चेंडूत १३९ धावांची सलामी देत संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. याला उत्तर देताना ननावरे स्पार्ट्स फाऊंडेशनचा डाव १३४ धावांवर मर्यादित राहीला.

या स्पर्धेचे उद्घाटन सुजनीलचे कार्यकारी संचालक आशिष देसाई आणि महाराष्ट्रीय मंडळचे कार्यवाह आणि पुणेरी
बाप्पा संघाचा कर्णधार रोहन दामले यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे संचालक आणि संयोजक विक्रम देशमुख
यांनी पाहूण्यांचे आभार मानले व या स्पर्धेमागची संकल्पना स्पष्ट केली.

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
२२ यार्ड्स क्लबः १९.२ षटकात १० गडी बाद ११७ धावा (खुश पाटील ३१, वैंकटेश्‍वर चव्हाण ३०, वरद कुलकर्णी १८,
केदार बजाज ३-५, गौरव खैरे २-२६) पराभूत वि. सेंन्च्युरी क्रिकेट क्लबः १६.१ षटकात ५ गडी बाद १२० धावा
(गौरव खैरे नाबाद ६१ (३४, ८ चौकार, २ षटकार), नील गांधी नाबाद ३०, वैंकटेश्‍वर चव्हाण ४-२१); सामनावीरः गौरव खैरे;

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः २० षटकात २ गडी बाद १७४ धावा (मनलिव सिंग घई ९६ (६८, १४ चौकार, ४ षटकार),
युसफ मेमन ४७, साहील अभंग १-२१);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी मनलिव आणि युसफ यांच्यात १३९ (१०१)
वि.वि. ननावरे स्पार्ट्स फाऊंडेशनः २० षटकात ८ गडी बाद १३४ धावा (अर्जुन वाघ ४४, तुषार शर्मा ३४, फयान बागवान
नाबाद २८, ओम माळी २-१९); सामनावीरः मनलिव सिंग घई;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जिओ कस्टमर केअर मधून बोलतोय! पुण्यातील तरुणीला 5 लाखांचा गंडा

Chitra Wagh On Supriya Sule | राज्याच्या मोठ्ठ्या ताई…तुमची चॉईसच वेगळी, महाराष्ट्र तरी काय करणार?, चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका (व्हिडिओ)