Pune Crime News | जिओ कस्टमर केअर मधून बोलतोय! पुण्यातील तरुणीला 5 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जिओ कस्टमर केअर (Jio Customer Care) मधून बोलत असल्याचे सांगून पुण्यातील एका तरुणीला सायबर चोरट्यांनी (Cyber Thief) 5 लाख 20 हजार रुपयांचा गंडा (Cheating Fraud Case) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान वानवडी येथे ऑनलाईन घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी वानवडी येथे राहणाऱ्या 27 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 8479808998, 6380102057 या दोन मोबाइल धारकांवर आयपीसी 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फोन करुन जिओ कस्टमर केअर मधून बोलत
असल्याचे सांगितले. त्यांना एचडीएफसी बँकेला लिंक असलेला मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याचे सांगून
अ‍ॅसिस्ट अ‍ॅप (Assist App) डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप
डाऊनलोड केले. सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांचा मोबाईल रिचार्ज करण्याच्या बहाण्याने त्यांच्या खात्यावर 8 लाख
रुपये कर्ज घेतले. त्यानंतर कर्जाच्या रक्कमेतील 5 लाख 20 हजार रुपये स्वत:च्या बँक खात्यात ट्रान्सफर करुन
फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Pathare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CBDT Chairman on Taxpayers | टॅक्‍सपेयर्सबाबत सीबीडीटी चेअरमनचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ७० टक्के करदाते…

Pune Crime News | पीएफचे 13 लाख रुपये भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न करता कामगारांची फसवणूक

Bank of Maharashtra | आजपासून ठेवींवर १.२५% जादा व्याज, या सरकारी बँकेची दिवाळीपूर्वी ग्राहकांना भेट