“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | पहिली ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; एमसीव्हिसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा सलग दुसरा विजय; स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीची विजयी कामगिरी !!

पुणे : “Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत एमसीव्हिसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने सलग दुसरा तर, स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ध्रुविल रैठाठा याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीने व्हिज्डम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ९ धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १२८ धावांचे लक्ष्य उभे केले. ध्रुविल रैठाठा (३८ धावा) आणि निशांत शेवाळे (२१ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हिज्डम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ११९ धावांवर मर्यादित राहीला. तेजस कोद्रे (३६ धावा) आणि सतिश राठोड (३९ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. ध्रुविल रैठाठा याने १० धावात ३ आणि अनुराग सी. यानेसुद्धा ३ गडी बाद केले.

साहील गोपाळघारे याच्या कामगिरीच्या जोरावर एमसीव्हिसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने पीआयओसी क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ३ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पीआयओसी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १७८ धावा धावफलकावर लावल्या. अर्णव पुरोहीत (३६ धावा), अर्जुन घोडके (३५ धावा) आणि सागर कुडाळकर (२६ धावा) संघाच्या डावाला आकार दिला. साहील गोपाळघारे याने २ गडी बाद केले. एमसीव्हिसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने हे लक्ष्य १६.३ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. श्रेयस आंबिलढगे याने नाबाद ३२ धावा, वासिम मुलाणी ३१ धावा, विशाल गव्हाणे ३० धावा आणि साहील गोपाळघारे याने १५ धावा करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १९.४ षटकात १० गडी बाद १२८ धावा (ध्रुविल रैठाठा ३८, निशांत शेवाळे २१, विग्नेश काटे १९,
अमन पठाण ४-२५, मानस काकडे २-२१) वि.वि. व्हिज्डम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १९.४ षटकात १० गडी बाद ११९ धावा
(तेजस कोद्रे ३६, सतिश राठोड ३९, ध्रुविल रैठाठा ३-१०, अनुराग सी. ३-२६); सामनावीरः ध्रुविल रैठाठा; (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

पीआयओसी क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १७८ धावा (अर्णव पुरोहीत ३६, अर्जुन घोडके ३५, सागर कुडाळकर २६,
प्रथमेश फाळके २७, साहील गोपाळघारे २-४२) पराभूत वि. एमसीव्हिसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १६.३ षटकात ७ गडी बाद
१८१ धावा (श्रेयस आंबिलढगे नाबाद ३२, वासिम मुलाणी ३१, विशाल गव्हाणे ३०, साहील गोपाळघारे १५,
अर्णव पुरोहीत २-३४); सामनावीरः साहील गोपाळघारे;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | विमाननगर परिसरात दहशत माजवणाऱ्या करण हतागळे व त्याच्या एका साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 72 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | अमोल मिटकरींचा रावण दहन प्रथेवर आक्षेप; हिवाळी अधिवेशनात करणार ‘ही’ मोठी मागणी