“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | पहिली ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एमसीव्हीसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- “Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament) सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि एमसीव्हीसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत यतिराज पाटोळे याच्या शतकी खेळीच्या जोरावर सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ४७ धावांनी सहज पराभव केला. यतिराज पाटोळे याने ५७ चेंडूत १३ चौकार आणि ५ षटकारांसह ११३ धावांची खेळी साकारली. यामुळे सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २१७ धावांचा डोंगर उभा केला. याला उत्तर देताना स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १७० धावांवर मर्यादित राहीला. एकनाथ देवाडे याने ५१ धावांची तर, तन्मय पाटील याने ३३ धावांची खेळी केली. विकी झालके (३-१९) आणि यतिराज पाटोळे (२-२४) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय साकार केला.

निशांत पवार याच्या ४४ धावांच्या योगदानाच्या जोरावर एमसीव्हीसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने त्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ३ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना त्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमीला ११२ धावा काढता आल्या. एमसीव्हीसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने हे लक्ष्य १५.४ षटकात गाठले. निशांत पवार याने ४४ धावांची तर, रमेश बात्रा याने २९ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद २१७ धावा (यतिराज पाटोळे ११३ (५७, १३ चौकार, ५ षटकार),
वैभव मोरे ४०, स्वानंद देशमुख २०, आर्य मुरकूटे २-२३) वि.वि. स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १७०
धावा (एकनाथ देवाडे ५१ (२६, १० चौकार, १ षटकार), तन्मय पाटील ३३, शुभम कांबळे २२, विकी झालके ३-१९,
यतिराज पाटोळे २-२४); सामनावीरः यतिराज पाटोळे;

त्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १५.५ षटकात १० गडी बाद ११२ धावा (सुदर्शन कुंभार २४, अमन सिंग १६, साई राठोड २-१८,
आनंद बनसोड २-२२) पराभूत वि. एमसीव्हीसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १५.४ षटकात ७ गडी बाद ११५ धावा
(निशांत पवार ४४, रमेश बात्रा २९, सुदर्शन कुंभार २-२३); सामनावीरः निशांत पवार;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | हवेली क्रमांक 24 चे सहदुय्यम निबंधक निलंबित, 24 कोटी मुद्रांक शुल्क कमी आकारल्याने कारवाई

Pune Police Mcoca Action | मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 70 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA