Pune Crime News | हवेली क्रमांक 24 चे सहदुय्यम निबंधक निलंबित, 24 कोटी मुद्रांक शुल्क कमी आकारल्याने कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे Office of the Sub-Registrar (हवेली क्रमांक 24) सहदुय्यम निबंधक एस.पी. भातंबरेकर (Deputy Registrar S.P. Bhatambarekar) यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. खरेदीखताच्या दस्तातमध्ये तब्बल 24 कोटी 90 लाख रुपयांचे मुद्रांक शुक्ल कमी आकारल्या प्रकरणी भातंबरेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे (State Government) अवर सचिव प्रितमकुमार जावळे यांनी प्रस्तुत केले. (Pune Crime News)

आकुर्डी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला (हवेली क्रमांक 24) 12 ऑक्टोबर रोजी पुणे शहराचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे (Stamp Collector Santosh Hingane) यांची अचानक भेट दिली. तसेच हिंगाणे यांच्या कार्यालयातील तपासणी पथकाकडून हवेली क्रमांक 24 या कार्यालयाची चालू वर्षीतील सप्टेंबर आणि 11 ऑक्टोबरपर्य़ंत नोंदवण्यात आलेल्या दस्तांची रॅण्डम पद्धतीने तापसणी करण्यात आली. यामध्ये भातंबरेकर यांनी 11 सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या एका खरेदीखताच्या दस्तात 24 कोटी 90 लाख 15 हजार 800 रुपयांचा मुद्रांक शुल्कची रक्कम कमी आल्याचे दिसून आले. यासंदर्भात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी हा प्रकार 17 ऑक्टोबरला राज्य शासनाला कळवला होता. (Pune Crime News)

त्यानुसार भातंबरेकर यांनी खरेदीखताच्या दस्तात मुद्रांक शुल्क न आकारता शासनाचा महसूल बुडवल्याचे समोर आले.
त्यामुळे भातंबरेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 19 ऑक्टोबर पासून पुढील आदेश येईपर्यंत
त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत भातंबरेकर यांचे मुख्यालय मुद्रांक जिल्हाधिकारी,
गडचिरोली असणार आहे. शासनाच्या पूर्वपरवानगिशिवाय त्यांना मुख्यलय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange | नारायण राणे यांना जरांगेंचे सणसणीत प्रत्युत्तर, गोरगरीब मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नका

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ललित पाटील प्रकरणावरुन फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, शिवसेना कनेक्शन दाखवत म्हणाले… (व्हिडिओ)