“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | पहिली ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी, अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी घौडदौड !!

पुणे : “Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने विजयाची हॅट्रीक नोंदविली. अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमी प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून सलग दुसर्‍या विजयासह आगेकूच केली. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत यश बोरकर याच्या स्फोटक फलंदाजीमुळे अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ननावरे स्पार्ट्स फाऊंडेशनचा २ गडी राखून पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना ननावरे स्पार्ट्स फाऊंडेशनने १३७ धावांचे आव्हान उभे केले. तुषार शर्मा याने ४४ धावांची तर, अर्जुन वाघ याने २७ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा संघ ७८ धावांवर ८ बाद असा अडचणीमध्ये सापडला होता. परंतु यश बोरकर याने २३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा चोपल्या. यश आणि ओम पचोरे (नाबाद ५) यांनी नवव्या गड्यासाठी ३३ चेंडूत ६७ धावांची अभेद्य भागिदारी केली आणि संघाचा विजय साकार केला.

गौरव लंगोरे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोराव सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून सहज पराभव करत सलग तिसरा विजय नोंदविला. आणखी एका झालेल्या सामन्यात अमन पठाण याच्या गोलंदाजीच्या कामगिरीमुळे व्हिज्डम क्रिकेट अ‍ॅकॅडमीने सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १०९ धावांनी सहज पराभव करून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
व्हिज्डम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ६ गडी बाद १५९ धावा (परमेश्‍वर राठोड ६३ (३७, ७ चौकार, ३ षटकार), सतिश राठोड २९, प्रथमेश हेगाणा २-१०) वि.वि. सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १४.३ षटकात १० गडी बाद ५० धावा (यतिराज पाटोळे १६, अमन पठाण ३-७, आतिश राठोड ३-९); सामनावीरः अमन पठाण;

ननावरे स्पार्ट्स फाऊंडेशनः २० षटकात ८ गडी बाद १३७ धावा (तुषार शर्मा ४४, अर्जुन वाघ २७, कार्तिक जगताप २-१४,
ओम पचोरे २-३०, हर्ष मालू २-३२) पराभूत वि. अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १६.४ षटकात ८ गडी बाद १४१ धावा
(यश बोरकर नाबाद ४५ (२३, ७ चौकार, २ षटकार), अव्देत गायकवाड २९, शिवराज कामठे १७, पियुश शिंदे ३-४२,
अझिम सय्यद २-१५);(भागिदारीः नवव्या गड्यासाठी नाबाद भागिदारी यश आणि ओम पचोरे (नाबाद ५) ६७ (३३);
सामनावीरः यश बोरकर;

कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १३.३ षटकात १० गडी बाद ९३ धावा (आयुश शर्मा ११, तनिश शर्मा १७, गौरव लंगोरे ३-१२,
विशाल परीक ३-२५, गौरव खैरे २-२३) पराभूत वि. सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ८ षटकात २ गडी बाद ९४ धावा
(अजित देशमुख नाबाद ४१, समर सिंग २८, पुष्कराज पाटील १७); सामनावीरः गौरव लंगोरे;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | होम ग्राऊंडवर नामुष्की! अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे

Pune Drug Case | ललित पाटील पलायन प्रकरण : ससून रुग्णालयाचे डीन मेहरबान असल्याचा पुरावा आला समोर